१९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन कबर सुशोभिकरण प्रकरणी पोलीस तपास सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2022 09:14 AM2022-09-09T09:14:51+5:302022-09-09T09:17:31+5:30

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड टायगर मेमन याचा भाऊ असलेल्या याकूब मेमन याला विशेष टाडा न्यायालयाने २००७ मध्ये भादंवि कलम १२० (ब) अन्वये गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. त्यानंतर त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. 

Police investigation in the case of beautification of Yakub Memon's grave accused in 1993 serial blasts | १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन कबर सुशोभिकरण प्रकरणी पोलीस तपास सुरू 

१९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन कबर सुशोभिकरण प्रकरणी पोलीस तपास सुरू 

Next

मुंबई: मुंबईसह देशाला हादरवून टाकणाऱ्या १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी याकूब मेमन याच्या कबरीच्या चौथऱ्याला संगमरवरी लाद्या बसवत तिचे सुशोभिकरण करण्याच्या प्रकाराचा मुंबई पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. 

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड टायगर मेमन याचा भाऊ असलेल्या याकूब मेमन याला विशेष टाडा न्यायालयाने २००७ मध्ये भादंवि कलम १२० (ब) अन्वये गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. त्यानंतर त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. 

याकूब मेमन याला नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये फासावर लटकवण्यात आले. त्यानंतर याकूब मेमन याला मरिन लाइन्स रेल्वे स्थानक येथील बडा कब्रस्थान दफनभूमीत दफन करण्यात आले होते. याकूब मेमनच्या कबरीची जमीन त्याच्या कुटुंबाने खरेदी केली असल्याची माहिती समोर आली आहे. 

त्यानंतर आता ही कबर लाद्या -
बसवून रंगरंगोटी करून सजविण्यात आली आहे. त्यामुळे खरोखरच मुस्लीम दफनभूमी ट्रस्टने ही जागा विकली आहे का? कबर सुशोभीकरणाला कोणी परवानगी दिली? असे अनेक सवाल यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. हे सुशोभिकरण कोणी व का केले? यासाठी कुणाचा पैसा वापरण्यात आला? याबाबत मुंबई पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

Web Title: Police investigation in the case of beautification of Yakub Memon's grave accused in 1993 serial blasts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.