पोलिसांनी सोडला समाधानाचा सुस्कारा

By admin | Published: July 19, 2015 02:14 AM2015-07-19T02:14:25+5:302015-07-19T02:14:25+5:30

रमजान महिन्यात अतिरेकी हल्ल्याबाबत गुप्तचर यंत्रणेकडून येणाऱ्या सतर्कतेच्या सूचना आणि पुण्यातील जातीय दंगलीच्या पार्श्वभूमीवर महानगरात

The police left the solution | पोलिसांनी सोडला समाधानाचा सुस्कारा

पोलिसांनी सोडला समाधानाचा सुस्कारा

Next

मुंबई : रमजान महिन्यात अतिरेकी हल्ल्याबाबत गुप्तचर यंत्रणेकडून येणाऱ्या सतर्कतेच्या सूचना आणि पुण्यातील जातीय दंगलीच्या पार्श्वभूमीवर महानगरात या काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी मुंबई पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. पहिल्या रोजापासून ते ईदच्या नमाज पठणापर्यंत शहर व उपनगरात एकही अनुचित घटना न घडल्याने पोलीस यंत्रणेने समाधानाचा सुस्कारा सोडला.
साप्ताहिक सुट्या, रजा अधिकृतपणे बंद नसल्या तरी बंदोबस्ताच्या नावाखाली वरिष्ठांकडून त्या मंजूर केल्या जात नव्हत्या. त्यामुळे कर्तव्यावर हजर असलेल्या या कर्मचाऱ्यांना आतातरी हक्काची सुट्टी, रजा मिळावी अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
रमजानच्या कालावधीमध्ये अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी बंदोबस्ताचे विशिष्ट पद्धतीने नियोजन केले होते. मुस्लीमबहुल वस्त्यांसोबत मशीद, मदरशांभोवती साध्या व गणवेषातील पोलीस दिवसरात्र गस्त घालत होते. महत्त्वाच्या व वर्दळीच्या ठिकाणी ड्रोन, खेळण्यातील विमाने उडविण्यास व वाद्यवृंदाची उपकरणे वापरण्यावर बंदी घालण्यात आली.
दरम्यान, पंधरवड्यापूर्वी पुण्यात पर्वती येथे दोन समाजांत दगडफेक होऊन नुकसान झाले होते, त्यामुळे बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली होती. या परिसरात संशयास्पदरीत्या अढळणाऱ्या व्यक्ती, वस्तूबाबत तातडीने शहानिशा केली जात होती. या कामासाठी संबंधित मशिदीचे पदाधिकारी व स्थानिक नागरिकांनी पोलिसांना मदत केली. ईद शांततेत पार पडल्याने पोलिसांनी समाधान व्यक्त केले. (प्रतिनिधी)

Web Title: The police left the solution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.