लोहमार्ग पोलिसांनी पकडली २५ लाखांची रोकड

By admin | Published: December 29, 2016 08:11 PM2016-12-29T20:11:30+5:302016-12-29T20:12:36+5:30

लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने थेट उत्तर प्रदेशातून रेल्वेने आणण्यात येत असलेली २५ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे.

Police looted Rs 25 lakh in cash | लोहमार्ग पोलिसांनी पकडली २५ लाखांची रोकड

लोहमार्ग पोलिसांनी पकडली २५ लाखांची रोकड

Next

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 29 - लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने थेट उत्तर प्रदेशातून रेल्वेने आणण्यात येत असलेली २५ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. विशेष म्हणजे या रकमेमध्ये दोन हजाराच्या नव्या नोटा आहेत. याबाबत प्राप्तिकर विभागाला माहिती कळवण्यात आली असून दोघाजणांना ताब्यात घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सातव यांनी दिली.

मनिष उमाशंकर द्विवेदी (वय ३६, रा. शिवनगर कॉलनी, भुलणपुर, जि. वाराणसी, उत्तरप्रदेश), प्रमोदकुमार मेवालाल जैसवाल (वय २४, रा. नुरी, जि. चंदोली, उत्तरप्रदेश) अशी दोघांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिष आणि प्रमोदकुमार गुरुवारी दुपारी ज्ञानगंगा एक्स्प्रेसने पुणे रेल्वे स्थानकावर पोहचले. फलाट क्रमांक दोनवर पोलिसांकडून नेहमीप्रमाणे सुरक्षेबाबत बॅग तपासणी सुरु होती. या दोघांच्या बॅगांची तपासणी केली असता त्यामध्ये दोन हजारांच्या नव्या नोटांचे बंडल दिसून आले.
त्यांच्याक डे याबाबत चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला समाधानकारक उत्तरे दिली नाहीत.

पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. तेथे अधिक चौकशी केली असता ही रक्कम वाराणसी येथील गंगा पेपर्स लिमिटेड या कंपनीची असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पुण्यातील एका अधिका-याला देण्यासाठी ही रक्कम आणल्याची माहितीही या दोघांनी दिली आहे. त्यांच्याकडे रकमेची खातरजमा करणारी कोणतीही कागदपत्रे नसल्यामुळे पोलिसांनी रोकड जप्त केली आहे. कारवाईदरम्यान पोलिसांनी प्राप्तिकर विभागाला माहिती कळवली असून रक्कम आणि या दोघांना त्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. जुन्या नोटा बदलण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक असताना लोहमार्ग पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई अधिक्षक डॉ. प्रभाकर बुधवंत, अतिरिक्त अधिक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी तुकाराम वहीले, वरिष्ठ निरीक्षक संजय सातव, सहायक निरीक्षक हिम्मत माने पाटील, कर्मचारी बी. डी. ओंबासे, पोलीस नाईल लाखे यांनी केली आहे.

Web Title: Police looted Rs 25 lakh in cash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.