पोलीस यंत्रणा अपयशी ठरली -हकीम

By admin | Published: June 8, 2014 01:50 AM2014-06-08T01:50:01+5:302014-06-08T01:50:01+5:30

फेसबुकवरील आक्षेपार्ह प्रकरणात एका विशिष्ट समाजाविरूद्ध वातावरणनिर्मिती केली जात होती. पुणो शहरात तणावाचे वातावरण होते.

Police machinery fails -Hackem | पोलीस यंत्रणा अपयशी ठरली -हकीम

पोलीस यंत्रणा अपयशी ठरली -हकीम

Next
>पुणो : फेसबुकवरील आक्षेपार्ह प्रकरणात एका विशिष्ट समाजाविरूद्ध वातावरणनिर्मिती केली जात होती. पुणो शहरात तणावाचे वातावरण होते. या सर्व परिस्थितीची पेरणी गेल्या वर्षभरापासून सुरू होती़ मात्र यात पोलिसांनी वेळीच गांभीर्याने लक्ष न दिल्याने एका तरूणाचा खून झाला. या सर्व परिस्थितीत पोलिस यंत्रणोचे पूर्णत: अपयश आहे. समाजातील जनसामन्यांना संरक्षण देण्यात पोलिस अपयशी ठरले, असा ठपका पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मुनाफ हकीम यांनी शनिवारी पुणो पोलिसांवर ठेवला. 
फेसबुक प्रकरणानंतर पुण्यातील तणावाच्या अनुषंगाने जिलतील कायदा व सुव्यवस्थेबाबत पाहणी करण्यासाठी हकीम हे पुणो दौ:यावर आले होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त व पोलीस अधीक्षक यांच्यासोबत बैठक घेतली. खून झालेल्या हडपसर परिसराची पाहणी व स्थानिकांशी संवाद साधला.
हकीम म्हणाले, गेल्या वर्षभरात हिंदू राष्ट्र सेनेच्यावतीने चिथावणी देणारे, प्रय} सुरू होते. प्रक्षोभक वक्तव्यांचे पत्रके वाटून वातावरण बिघडवण्याचा संघटनेकडून प्रय} झाला होता. त्याचे पोलिसांनी वेळीच गांभीर्य लक्षात का घेतले नाही. खूनाची घटना घडण्यापूर्वीही फेसबुकवरील आक्षेपार्ह कृत्य सुरू होते. 
तणावाची इतकी परिस्थिती निर्माण होण्याआधीच पोलिसांनी उपाययोजना, योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता होती. पोलिसांच्या बैठकीत, इतक्या टोकाचा प्रकार घडतो याचा अर्थ आपली गुप्तचर यंत्रणा माहिती घेण्यात कमी पडते का?, पोलिसांनी शांतता समितीची स्थापना करून अशा प्रकारांना आळा घालावा यासंबंधी पोलिसांना सूचना दिल्याचे हकीम यांनी सांगितले.
 
च्अनेक ठिकाणी पोलिस यंत्रणोकडे आरोपींसंबधी माहिती उपलब्ध होत आहे त्यानुसार कारवाई करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांना काही सूचना करण्यात आल्या. 
च्पोलिसांनी हा अचानक उद्भवलेला प्रसंग असल्याचे म्हटले आहे ते आपल्याला मान्य नाही़ अहवाल मंगळवारपर्यत मुख्यमंत्र्यांना सादर करू असे हकीम यांनी सांगितले. 

Web Title: Police machinery fails -Hackem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.