आता मुंबईत होणार ‘पोलीस संग्रहालय’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 04:32 AM2018-05-11T04:32:34+5:302018-05-11T04:32:34+5:30
मुंबई पोलिसांच्या ऐतिहासिक पोलीस नोंदीचे जतन करणे तसेच पोलीस म्युझिअमसाठी मुंबई पोलिसांच्या मुंबई पोलीस प्रतिष्ठान आणि टाटा ट्रस्टने पुढाकार घेतला. त्यामुळे हे मुंबईतील आधुनिक पोलीस संग्रहालय ठरणार आहे.
मुंबई - मुंबई पोलिसांच्या ऐतिहासिक पोलीस नोंदीचे जतन करणे तसेच पोलीस म्युझिअमसाठी मुंबई पोलिसांच्या मुंबई पोलीस प्रतिष्ठान आणि टाटा ट्रस्टने पुढाकार घेतला. त्यामुळे हे मुंबईतील आधुनिक पोलीस संग्रहालय ठरणार आहे.
मुंबईतील पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबांच्या कल्याणाला चालना देण्याच्या तसेच नागरिकांच्या कल्याणासाठी पोलीस दलामधील कार्यक्षमता, कौशल्ये, तंत्रज्ञान व आधुनिकीकरणाला उत्तेजन देण्याच्या उद्दिष्टाने या ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. पोलीस ठाण्यांचे कंप्युटरायझेशन, ऐतिहासिक मूल्य असलेल्या कलाकृती आणि/किंवा उपकरणांचे जतन हीदेखील ट्रस्टपुढील प्रमुख उद्दिष्टे आहेत. मुंबई पोलीस दलाची कार्यक्षमता वाढविणे तसेच पोलिसांच्या सामाजिक, सांस्कृतिक व सार्वजनिक कल्याणाची खातरजमा करण्याच्या दृष्टीने अनेकविध उद्दिष्टे या प्रतिष्ठानसमोर आहेत. याचे रूपांतर संग्रहालयात व्हावे यासाठी १९८४ सालापासून प्रयत्न सुरू होते. अखेर मुंबईचे पोलीस आयुक्त दत्तात्रय पडसलगीकर आणि त्यांची टीम, मुंबई पोलीस प्रतिष्ठान यांनी पुढाकार घेतला.