20 हजार गावांना लवकरच मिळणार पोलीस पाटील
By admin | Published: July 1, 2014 01:59 AM2014-07-01T01:59:12+5:302014-07-01T01:59:12+5:30
पोलीस पाटलांची राज्यभरातील रिक्त पदे त्वरित भरण्यासंबंधी गृह सचिवांसोबत बैठक बोलावणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य सचिव ज. स. सहारिया यांनी पुणो येथे बैठकीत दिली.
Next
>यवतमाळ : पोलीस पाटलांची राज्यभरातील रिक्त पदे त्वरित भरण्यासंबंधी गृह सचिवांसोबत बैठक बोलावणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य सचिव ज. स. सहारिया यांनी पुणो येथे बैठकीत दिली.
राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आदी महसूल अधिका:यांची महत्वपूर्ण बैठक ‘यशदा’मध्ये पार पडली. या बैठकीत जिल्हाधिका:यांनी पोलीस पाटलांच्या रिक्त पदांचा मुद्दा उपस्थित केला. राज्यात पोलीस पाटलांची 4क् हजारपैकी 2क् हजार पदे रिक्त असल्याने ग्रामीण भागातील प्रशासकीय व्यवस्थापनात कशा अडचणी निर्माण होतात याचा पाढाच मुख्य सचिवांपुढे वाचला गेला. या मुद्यावर बहुतांश अधिका:यांच्या भावना तीव्र होत्या. अखेर सहारिया यांनी या चर्चेत हस्तक्षेप करीत पोलीस पाटील भरतीवर गृहसचिवांची तातडीने बैठक बोलविली जाईल, असे स्पष्ट केले. (जिल्हा प्रतिनिधी)
गारपीट आणि अतिवृष्टीचे कारण पुढे करीत गृहखात्याने चक्क पोलीस पाटील भरतीलाच स्थगनादेश दिल्याची बाब एका जिल्हाधिका:यांनी या बैठकीत निदर्शनास आणून दिली. कारण गारपीट आणि अतिवृष्टीतच गावात पोलीस पाटलांची नितांत आवश्यकता असताना याच कारणावर स्थगनादेश कसा काय दिला जाऊ शकतो, याबाबत खुद्द सचिवांनीही आश्चर्य व्यक्त केले.