पोलिसांची गस्त आजपासून सायकलवरून

By admin | Published: June 11, 2017 09:57 PM2017-06-11T21:57:04+5:302017-06-11T21:57:04+5:30

शहरात कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आता पोलीस सायकलवरून दिवस-रात्र शहरात गस्त घालतील. या नवीन

Police patrol from the bicycle today | पोलिसांची गस्त आजपासून सायकलवरून

पोलिसांची गस्त आजपासून सायकलवरून

Next
> ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 11 - शहरात कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आता पोलीस सायकलवरून दिवस-रात्र शहरात गस्त घालतील. या नवीन गस्तीचा प्रारंभ पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्या हस्ते आज, सोमवारी सकाळी अकरा वाजता दसरा चौकातून होत आहे. 
चाळीस वर्षांपूर्वी पोलीस सायकलवरून गस्त घालीत होते. त्यानंतर सायकलची जागा दुचाकीने घेतली. सध्या पोलीस दलात दुचाकी व चारचाकीमधून पोलीस दिवसा-रात्री गस्त घालत असतात. अशा वेळी एखाद्या कॉलनीत चोरटा शिरला असेल तर वाहनाच्या आवाजाने तो लपून बसतो. ते निघून गेल्यानंतर चोरी करून तो पसार होतो. अशा वेळी आवाज न होता पोलीस शहरात, उपनगरांत सर्वत्र फिरू लागले तर त्यांना चोरटे दिसून येतील आणि होणाºया घरफोड्या वाचतील, हा  उद्देश समोर ठेवून कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी शहरात पोलिसांना सायकलवरून गस्त घालण्यास सक्ती करा, असे आदेश पोलीस अधीक्षक मोहिते यांना दिले. त्यानुसार त्यांनी ३५ सायकली खरेदी केल्या आहेत. शहरात राजारामपुरी, जुना राजवाडा, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, करवीर अशी पाच पोलीस ठाणी आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यास पाच सायकली देण्यात आल्या आहेत. या सायकलीवर पुढे ‘कोल्हापूर पोलीस’ नावाची पाटी आहे. त्यानंतर प्रत्येक सायकलीवर ज्या-त्या पोलीस ठाण्याचे नाव आहे. दिवसा व रात्री ठरावीक वेळेत हे पोलीस शहरात गस्त घालणार आहेत. प्रत्येक पोलिसाला क्रमवार पद्धतीने ही गस्त सायकलवरून घालावी लागणार आहे. प्रदूषणमुक्त, इंधन बचत, आरोग्यास लाभदायक असा या सायकल गस्तीचा फायदा पोलिसांना होणार आहे. 
 
आरोग्यास फायदा 
 
कामाचा अतिरिक्त ताण पडल्याने पोलिसांचे स्वास्थ्य बिघडले आहे. अवेळी जेवण, व्यायामाचा अभाव यांमुळे अनेकांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे. गस्तीच्या निमित्ताने प्रत्येक पोलिसाला नियमितपणे रोज सात किलोमीटर अंतर सायकलवरून पार करावे लागणार आहे. या मेहनतीमुळे पोलिसांचे आरोग्य चांगले राहणार आहे. 
 
एस.पीं.ची सायकल गस्त 
 
महिन्यातून एकदा पोलीस अधीक्षक संजय मोहिते हेही शहरात सायकलवरून रात्रगस्त घालणार आहेत; तर शहर पोलीस उपअधीक्षक व निरीक्षक दर आठवड्याला गस्त घालणार आहेत. 

Web Title: Police patrol from the bicycle today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.