सातपूर परिसरातील जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा
By admin | Published: July 20, 2016 04:52 PM2016-07-20T16:52:19+5:302016-07-20T16:52:19+5:30
सातपूर परिसरातील कार्बन नाक्यावर सुरू असलेल्या जुगार अड्डयावर पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे व पोलिसांनी बुधवारी (दि़२०) दुपारी छापा टाकला़ यामध्ये १६ जुगाऱ्यांना
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 20 - सातपूर परिसरातील कार्बन नाक्यावर सुरू असलेल्या जुगार अड्डयावर पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे व पोलिसांनी बुधवारी (दि़२०) दुपारी छापा टाकला़ यामध्ये १६ जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून रोख रकमेसह सुमारे सव्वा लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
सातपूर परिसरातील कार्बन नाक्यावर जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती उपायुक्त धिवरे यांना मिळाली होती़. त्यानुसार बुधवारी दुपारी त्यांनी निवडक सहकाऱ्यांसह या जुगार अड्डयावर छापा टाकला. यावेळी अड्डाचालक संशयित ईश्वर नामदेव परदेशी (५०, रा. श्रमिक नगर) याच्यासह हिम्मत अहिरे (२७,रा.शिवाजीनगर), किरण सुरवाडे (२०,रा.शिवाजीनगर), मधुकर खैरनार (२८, रा.शिवाजीनगर), सचिन कांबळे (२८, श्रमिक नगर), प्रकाश निकम (५६, राक़ोळीवाडा), दीपक अहिर (२८,रा़ शिवाजीनगर), सुरेश चव्हाण (५०, रा़ गोवर्धन), लक्ष्मण भांगडे (४२, रा.अशोकनगर), हेमंत बोराडे (४०), जगदीश कुमावत (२५,रा़अशोकनगर), निवृत्ती डहाळे (६०, रा.सातपूर), किरण कुमावत (३२, रा़ श्रमिक नगर), काशिनाथ खैरनार (रा. श्रमिक नगर), अण्णा पवार (२५, कार्बन नाका), सुरेश मोरे (५२, धर्माजी कॉलनी) हे जुगार खेळत होते.
पोलिसांनी या सोळा जुगाऱ्यांकडून १ लाख २७ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून त्यामध्ये रोख रक्कम व जुगाराच्या साहित्याचा समावेश आहे. पोलीस उपायुक्त धिवरे यांच्यासह त्यांचे सहकारी निकम, काझी, वायचळ , चव्हाण, परदेशी यांनी ही कारवाई केली़.