दौंड येथे पोलिसाला अज्ञात युवकांकडून मारहाण
By admin | Published: September 7, 2016 07:56 PM2016-09-07T19:56:01+5:302016-09-07T19:56:01+5:30
दौंड येथे ड्युटवर असलेले पोलीस कॉन्स्टेबल संदेश सूर्यवंशी यांना रात्रीच्या सुमारास मारहाण करण्याची घटना घडली.
ऑनलाइन लोकमत
दौंड, दि. 7 - राज्यात ठिकठिकाणी पोलिसांना मारहाण करण्याची घटना ताजी असतानाच दौंड येथे ड्युटवर असलेले पोलीस कॉन्स्टेबल संदेश सूर्यवंशी यांना रात्रीच्या सुमारास मारहाण करण्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांकडे कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही. मात्र पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर या घटनेचा शोध घेत आहेत. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कुरकुंभच्या दिशेने एक ट्रक येत होता. हा ट्रक भगतसिंग चौकातून वळत असताना हा ट्रक पोलीस कॉन्स्टेबल संदेश सुर्यवंशी (वय ३२) यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला.
मात्र ट्रकला चुकवत सुर्यवंशी बाजूला आले. नंतर ट्रकभरधाव वेगाने पाटसच्या दिशेने निघून गेला. या ट्रकचा पाठलाग सदरच्या पोलीसाने आणि नागरिकांनी केला आणि ट्रक पकडला. मात्र ट्रक चालक मद्यधुंद होता. ट्रक चालकावर कारवाई करण्याचा प्रयत्न सुर्यवंशी करीत असताना तेथे काही अज्ञात युवक आले. त्यांनी ट्रक चालकाला मारहाण करण्यास सुरुवात केली.
यावेळी ट्रकचालकाला युवकांच्या तावडीतून सोडविण्याचा सुर्यवंशी यांनी केला. तेव्हा या युवकांनी ट्रकचालक आणि पोलीस सुर्यवंशी यांना मारहाण केली. आणि ट्रकचालकाला पळूण जाण्यास मदत केली असल्याची माहिती पोलीस संदेश सुर्यवंशी यांनी सांगितले.
वेळ आली तर पोलीस सेवेचा राजीनामा देईल
यासंदर्भात पोलीस संदेश सुर्यवंशी म्हणाले मला मारहाण झाल्यानंतर मी ठाणे अंमलदार यांच्याकडे तक्रार देण्यासाठी आलो असता माझी तक्रार घेतली नाही याप्रकरणी मी अन्याय सहन करणार नाही. वेळ आली तर पोलीस सेवेचा राजीनामा देईल.