खाकी वर्दीवर पुन्हा उचलला हात, पोलीस शिपाई सूर्यवंशींना मारहाण

By admin | Published: September 15, 2016 12:43 AM2016-09-15T00:43:29+5:302016-09-15T00:43:29+5:30

गिरगाव चौपाटी येथे कर्तव्य बजावत असताना दोन तरुणांनी वाहतूक पोलीस हवालदार हेमंत सूर्यवंशी यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे.

Police raids on the Khaki uniform, assaulted Suryavanshi | खाकी वर्दीवर पुन्हा उचलला हात, पोलीस शिपाई सूर्यवंशींना मारहाण

खाकी वर्दीवर पुन्हा उचलला हात, पोलीस शिपाई सूर्यवंशींना मारहाण

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १५ : राज्यातील पोलिसांवर होणारे हल्ल्यांचे प्रकार सुरूच असून गिरगाव चौपाटी येथे कर्तव्य बजावत असताना दोन तरुणांनी वाहतूक पोलीस हवालदार हेमंत सूर्यवंशी यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. गिरगाव येथे गणपती विसर्जनावेळी आपले कर्तव्य बजावत असताना दोन तरुण दुचाकीस्वार चुकिच्या दिशेने यु टर्न घेत होते. त्यावेळी त्यांना विरोध केल्यामुळे तरुणांनी वाहतूक पोलीस हवालदार हेमंत सूर्यवंशी यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा प्रकार बुधवारी रात्री उशीरा घड़ला. आज दिवसभरातील ही दुसरी घटना आहे. 

साकी नाका पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक अल्पेश पाटील यांना दुपारी मारहाण केली. याप्रकरणी सुफियान खानला अटक करण्यात आली. त्यापाठोपाठ रात्री साडे नउच्या सुमारास सूर्यवंशी यांच्यावर हल्ला झाला. यातील एक आरोपी सूर्यवंशी यांच्या हाताला चावला. यामध्ये सूर्यवंशी जखमी झाले आहेत. अन्य पोलीस सहका-यांना माहीती मिळताच त्यांनी दोघाही तरुणांना ताब्यात घेतले.

दोघांना पोलीस ठाण्यात आणताच त्यांनीच पोलिसांवरच मारहाण झाल्याचा आरोप करत गोंधळ घातला. दोघेही राजकीय नेत्यांच्या मुलाचे मित्र असल्याचे समजते. राजकीय नेत्यांच्या मुलानेही पोलीस ठाण्यात अरेरावी सुरु केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.  याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल नसून गावदेवी पोलीस अधिक तपास करत आहेत.

दरम्यान,  मंगळवारी सकाळी पोलिस गंगाराम निवते यांच्यावर देखिल दोन दुचाकीस्वाराने हल्ला केला त्यात निवते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी २८ वर्षीय तरूणाला अटक करण्यात आली आहे. 

विनाहेल्मेट प्रवास करत असलेल्या अल्पवयीन दुचाकीस्वाराला हटकल्यानंतर झालेल्या मारहाणीनंतर पोलीस शिपाई विलास शिंदे यांच्या मृत्यूला १५ दिवसही उलटत नाहीत तोच राज्यात पोलिसांवरील हल्ल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.

२३ ऑगस्ट रोजी विलास शिंदे यांनी एका अल्पवयीन मुलाला विना हेल्मेट गाडी चालवताना पकडले होते. सदर मुलाकडे लायसन्सही नव्हते. दरम्यान, त्या मुलाची चौकशी सुरु असताना त्या मुलाने आपल्या भावाला बोलावून घेतले. यावेळी त्याच्या भावाने मागून येऊन थेट विलास शिंदे यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार केला. या हल्ल्यात विलास शिंदे जबर जखमी होऊन बेशुद्ध पडले. या हल्ल्यानंतर ते दोघेही पळून गेले. या घटनेनंतर विलास शिंदे यांना तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र ३१ ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला.

 

Web Title: Police raids on the Khaki uniform, assaulted Suryavanshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.