पोलीस शिपायाने नाकारले ६८ रुपयांचे मानधन

By admin | Published: January 8, 2015 01:38 AM2015-01-08T01:38:14+5:302015-01-08T01:38:14+5:30

साप्ताहिक सुटीच्या मोबदल्यात मिळणारे अवघे ६८ रुपयांचे मानधन थेट पोलीस महासंचालकांना १ जानेवारीला पत्र लिहून एका पोलीस शिपायाने नाकारले आहे.

Police recovers Rs 68 worth of money | पोलीस शिपायाने नाकारले ६८ रुपयांचे मानधन

पोलीस शिपायाने नाकारले ६८ रुपयांचे मानधन

Next

राजेश निस्ताने - यवतमाळ
साप्ताहिक सुटीच्या मोबदल्यात मिळणारे अवघे ६८ रुपयांचे मानधन थेट पोलीस महासंचालकांना १ जानेवारीला पत्र लिहून एका पोलीस शिपायाने नाकारले आहे. एवढेच नव्हे तर हे मानधन सरकारी तिजोरीत जमा करून त्याची रितसर पावती देण्याची मागणीही पत्राद्वारे केली आहे.
विश्वनाथ गोपाळराव नामपल्ले (ब.नं. ९५६) असे या पोलीस शिपायाचे नाव आहे. ते नांदेड जिल्ह्यातील हदगाव पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. साप्ताहिक सुटीच्या दिवशी काम केल्यास पोलीस शिपायांना केवळ ६८ रुपये मानधन दिले जाते. कामगार कायद्याप्रमाणे आठ तास काम केल्यास एक दिवसाचे वेतन देणे बंधनकारक आहे. मात्र पोलिसांना त्याचा फायदा मिळत नाही. कर्मचारी सुटीच्या दिवशी कामावर हजर झाल्यास नियमित वेतनासोबतच त्याला अतिरिक्त वेतन देणे अपेक्षित आहे. परंतु अतिरिक्त सोडा, पोलिसांना नियमित एक दिवसाचे वेतनही दिले जात नसल्याकडे त्यांनी महासंचालकांचे लक्ष वेधले आहे.
महसूल खात्याप्रमाणे पोलिसांनाही वेतनश्रेणी लागू करावी, यासाठी नागपूर ‘मॅट’मध्ये पोलिसांची कायदेशीर लढाई सुरू आहे.

प्रथा मोडली
च्पोलीस दल हे शिस्तीचे खाते आहे. थेट उच्चपदस्थांकडे परस्पर दाद मागण्याची प्रथा त्यांच्यात नाही. मात्र सहकाऱ्यांची समस्या सोडविण्यासाठी नामपल्ले यांनी शिस्त व प्रथा बाजूला ठेवली.

१महसूल खात्यात आठ तासांसाठी वर्ग- ३ च्या कर्मचाऱ्याला पाच हजार ८०० रुपये तर वर्ग दोनच्या अधिकाऱ्याला दहा हजार ८०० रुपये मूळ वेतन आहे.

२पोलीस खात्यात १२ तासांसाठी कर्मचाऱ्याला पाच हजार ३०० रुपये तर २४ तासांसाठी अधिकाऱ्याला दहा
हजार १०० रुपये मूळ वेतन आहे.

३पोलीस खात्यात वर्ग ३ च्या कर्मचाऱ्याला एका दिवसाचे वेतन ६५० रुपये व वर्ग २ च्या अधिकाऱ्याला १,१५० रुपये मिळते. मात्र साप्ताहिक सुटीच्या दिवसाचा कामाचा मोबदला अनुक्रमे केवळ ६८ आणि ९० रुपये दिला जातो.

Web Title: Police recovers Rs 68 worth of money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.