दारूच्या नशेत जाळल्या 27 गाड्या, पुणे जळीतकांडाचा आरोपी पोलिसांच्या ताब्यात
By admin | Published: July 9, 2017 01:46 PM2017-07-09T13:46:19+5:302017-07-09T13:49:10+5:30
पुण्यातील पर्वती परिसरात काल रात्री 27 गाड्या आग लावून जाळण्यात आल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी एका 25 वर्षीय तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 9 - पुण्यातील पर्वती परिसरात काल रात्री 27 गाड्या आग लावून जाळण्यात आल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी एका 25 वर्षीय तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दिनेश ऊर्फ झब्ब्या हरी पाटील( वय 25) असे आरोपीचे नाव आहे. हे सारे कृत्य त्याने केवळ दारूच्या नशेत केले असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली.
पुण्यातील पार्वती परिसरात पोलीस चौकीजवळच हे जळीतकांड झाले. यामध्ये टेम्पो,दुचाकी व सायकल अशी एकूण 27 वाहने जाळून खाक झाली. पार्वती परिसरात पर्वती पायथ्याजवळच्या जनता वसाहत गल्ली क्रमांक 38 जवळ स्वच्छतागृहाच्या शेजारी असलेल्या मोकळ्या मैदानात उभा असलेल्या एका दुचाकीला दिनेशने नशेत पेटवले. गाडीने पेट घेताचा ती आग इतर गाड्यांनीही पकडली. या आगीत 1 टेम्पो, 24 दुचाकी व 2 सायकल जाळून खाक झाली. ही घटना रात्री एकच्या सुमारास घडली. पर्वती परिसरातील वस्त्यांमध्ये अरुंद वाट असल्याने तेथील रहिवाशांकडून आपली वाहने मैदानात पार्क करून ठेवण्यात येत असतात. पुण्यामध्ये सातत्याने वाहनांच्या जाळपोळीचे प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत. आग विझवलवी. मात्र तोपर्यंत ही वाहने जळून गेली होती. दरम्यान, अज्ञाताने ही आग लावल्याच्या संशय व्यक्त करण्यात येत होता. अखेर पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला लगेच अटक केली आहे. पुण्यात आशा घटना सातत्याने घडत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक पोलीस प्रशासनावर प्रश्न चिन्ह उपस्थित करत आहे. रात्रीची घटना ही पोलीस चौकीजवळच घडल्याने याबाबतही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हे लोन केवळ पुणेच नाही तर पिंपरी-चिंचवड परिसरातही पसरले आहे.त्यामुळे पोलीस प्रशासनाने वेळीच पावले उचलून अशा विघातक गोष्टींवर नियंत्रण आणणे गरचेचे आहे.