पोलिसांनी आव्हानांसाठी सज्ज राहावे
By admin | Published: June 9, 2016 05:50 AM2016-06-09T05:50:09+5:302016-06-09T05:50:09+5:30
पोलीस दलाला आपल्या कार्यशैलीत बदल करून नवीन आव्हानांचा सामना करण्यासाठी सदैव सज्ज राहावे लागेल
नाशिक : बदलत्या काळानुसार गुन्ह्यांचे स्वरूपही बदलले आहे़ त्यानुसार पोलीस दलाला आपल्या कार्यशैलीत बदल करून नवीन आव्हानांचा सामना करण्यासाठी सदैव सज्ज राहावे लागेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या ११३ व्या तुकडीच्या दीक्षान्त संचलनप्रसंगी केले.
गडचिरोलीमध्ये पदोपदी मृत्यूचे सापळे, तर आयुष्यभराची पुंजी अवघ्या काही क्षणांत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने लुबाडली जात असल्याचे गुन्हे वाढले आहेत. पोलीस दलातील नवीन अधिकाऱ्यांना रस्त्यावरील गुन्हेगारीबरोबरच नव्या आव्हानांचाही सामना करावा लागणार आहे, असे ते म्हणाले. नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, गृहराज्यमंत्री रणजित पाटील व राम शिंदे, पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
महिला अधिकाऱ्यास
‘स्वार्ड आॅफ आॅनर’
मीना तुपे यांनी सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थीचा ‘स्वॉर्ड आॅफ आॅनर’ हा पुरस्कार प्राप्त केला़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मानाची तलवार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला़ दहा पुरस्कारांपैकी सात पुरस्कार हे महिलांनी, तर तीन पुरस्कार पुरुष प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी मिळविले.
महिला आघाडीवर
दीक्षान्त सोहळ््यातील ७४९ प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांमध्ये २४६ महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या ई-अकॅडमीचे उद्घाटन केले.