‘पोलिसांनी सायबर गुन्ह्यांची दखल घ्यावी’
By admin | Published: January 31, 2017 02:07 AM2017-01-31T02:07:05+5:302017-01-31T02:07:05+5:30
आक्षेपार्ह मजकूर व्हिडीओ असलेली संकेतस्थळे व सायबर क्राईम समाजाची मोठी समस्या आहे. त्यामुळे पोलिसांनी तक्रारीची वाट न पाहता स्वत:हूनच कारवाई करावी
मुंबई : आक्षेपार्ह मजकूर व्हिडीओ असलेली संकेतस्थळे व सायबर क्राईम समाजाची मोठी समस्या आहे. त्यामुळे पोलिसांनी तक्रारीची वाट न पाहता स्वत:हूनच कारवाई करावी,
अशी सूचना उच्च न्यायालयाने सोमवारी केली.
एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवणाऱ्या संकेतस्थळांवर कारवाई करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका अली अहमद सिद्दीकी यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. सोमवारच्या सुनावणीत मुख्य सरकारी वकील पुर्णिमा कंथारिया यांनी पोलिसांनी तपासानंतर २०० संकेतस्थळे बंद केल्याची माहिती खंडपीठाला दिली.
सायबर क्राईम आणि आक्षेपार्ह याचिकेवरील सुनावणी पुढील महिन्यात ठेवत उच्च न्यायालयाने पोलिसांनी यासंदर्भातील अहवाल दर महिन्याला दाखल करावा, असेही स्पष्ट केले. (प्रतिनिधी)