मजूर अड्डय़ाच्या जागी पोलिसांची शिरजोरी
By admin | Published: July 11, 2014 11:43 PM2014-07-11T23:43:36+5:302014-07-11T23:43:36+5:30
फरासखान्यासमोरील मजूर अड्डय़ाची जागा कित्येक वर्षापासून कष्टकरी वर्गाकरिता राखून ठेवण्यात आली आहे.
Next
पुणो : फरासखान्यासमोरील मजूर अड्डय़ाची जागा कित्येक वर्षापासून कष्टकरी वर्गाकरिता राखून ठेवण्यात आली आहे. परंतु, येथील जागेत एक शेड वगळता मागील मैदानात पोलिसांनी शिरजोरी करून प्रवेश केला आहे. जागेचा वापर पार्किगकरिता केला जात असून, अनेक बेवारस वाहने धूळ खात आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असून, त्या परिसरात अनोळखी वाहने सर्रास लावली जात असल्याने पोलिसांचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे.
सुमारे 1क्क् वर्षापासून शहराच्या मध्यवस्तीतील जागा म्हणून एका महिलेने ही जागा मजुरांकरिता दिली होती; परंतु पुण्याचा विस्तार जसजसा होत गेला, त्या प्रमाणात उपनगरांमध्ये मजूर अड्डे वाढत गेले. परंतु, ज्या ठिकाणापासून मजुरांच्या विस्ताराची सुरुवात झाली, ती जागा मात्र अरेरावी करणा:या पोलिसांच्या ताब्यात आहे. या जागेत मजूर भवन व्हावे, अशी मागणी कष्टकरी संघटनांकडून वारंवार होत होती; परंतु महापालिकेकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही.
बुधवार पेठ मजूर अड्डा ही नोंदणीकृत संस्था आजही येथे कार्यरत आहे. महापालिकेतर्फे येथे वाहनतळाचा मुद्दा पुढे आल्यानंतर मजुरांनी निदर्शने केली होती. त्यामुळे मजूर भवनासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली. त्यानंतरही विरोध कायम होता; त्यामुळे उच्च न्यायालयात लढा देऊन मजुरांकरिता ही जागा कायम ठेवण्यात कष्टकरी संघटनांना यश आले. परंतु, तरीही पोलिसी खाक्या वापरून अतिक्रमण केले आहे. गुरुवारी झालेल्या स्फोटाच्या पाश्र्वभूमीवर या जागेची पाहणी केली असता, तेथे बेवारस वाहने आढळून आली. त्यामुळे पोलिसांकडून अतिक्रमण होऊनही काळजीपूर्वकपणो जागेचा वापर होताना दिसत नाही. पोलिसांची शिरजोरी किती दिवस चालणार, असा सवाल कष्टकरी कामगार करीत आहेत. (प्रतिनिधी)
फरासखान्यासमोरील जागा कित्येक वर्षापूर्वी मजुरांकरिता दिलेली आहे. धनदांडग्यांच्या दबावामुळे ही जागा हडप करण्याचा प्रयत्न अनेकदा केला गेला; परंतु कष्टक:यांनी तो हाणून पाडला. बेवारस वाहनांमुळे धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने मजुरांकरिता त्वरित भवन उभारून द्यावे.
- नितीन पवार
निमंत्रक, हमाल पंचायत