शिवसैनिक रस्त्यावर उतरणार; महाराष्ट्र पोलिसांना कुणकुण लागली, अलर्ट राहण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 07:16 PM2022-06-24T19:16:56+5:302022-06-24T19:17:03+5:30

महाराष्ट्रातील सर्व पोलीस ठाण्यांना हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Police stations in Maharashtra especially those in Mumbai have been ordered to remain on high alert political crisis eknath shinde uddhav thackeray | शिवसैनिक रस्त्यावर उतरणार; महाराष्ट्र पोलिसांना कुणकुण लागली, अलर्ट राहण्याचे आदेश

शिवसैनिक रस्त्यावर उतरणार; महाराष्ट्र पोलिसांना कुणकुण लागली, अलर्ट राहण्याचे आदेश

googlenewsNext

आसामची राजधानी गुवाहाटी हे सध्या महाराष्ट्राच्या सत्ताकारणाचे केंद्रबिंदू बनले आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड पुकारणारे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत ४० हून अधिक आमदार आसाममधील गुवाहाटी येथे दाखल झाले आहेत. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर होण्याची चिन्हे आहेत. तर दुसरीकडे बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिकांनी नाराजी आणि संतापही व्यक्त केला आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती ढवळून निघत असतानाच शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी सेनाभवनाबाहेरही गर्दी करत शिवसेनेच्या आणि उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली होती. दरम्यान, आता मोठ्या प्रमाणात शिवसैनिक रस्त्यांवर उतरण्याची शक्यता व्यक्त करत महाराष्ट्रातीलपोलिसांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रातील सर्व पोलीस ठाण्यांना विशेषत: मुंबईतील पोलीस ठाण्यांना हाय अलर्टवर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवसैनिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरू शकतात, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. शांतता कायम राहावी यासाठी पोलिसांना सतर्क राहण्यास सांगितलं असल्याची माहिती एएनआयनं महाराष्ट्र पोलिसांच्या हवाल्यानं दिली आहे.


उद्धव ठाकरेंनी साधला संवाद
उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना ठाकरे आणि शिवसेना असं नाव न वापरता जगून दाखवा असा इशाराही दिला. माझा फोटो न वापरता लोकांमध्ये वावरून दाखवा. कुटुंबप्रमुखाला धोका देताय याचं वाईट वाटत असल्याचंही त्यांनी सांगितलं. माझं मुख्यमंत्रिपद मान्य नसणं ही राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे. झाडाची फुलं न्या, फांद्या न्या पण तुम्ही मूळ नेऊ शकत नाही. हे सर्व भाजपनं केलं असून त्यांची आग्र्याहून सुटका करावी लागेल. तुम्हाला भविष्य दिसत असले तर खुशाल जा पण बंडखोर आमदारांसाठी काय कमी केलं, असा सवालही त्यांनी केलं.

 

 

Web Title: Police stations in Maharashtra especially those in Mumbai have been ordered to remain on high alert political crisis eknath shinde uddhav thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.