चोरी प्रकरणातील पोलिसांचे पगार थांबविले

By admin | Published: June 9, 2017 04:47 AM2017-06-09T04:47:21+5:302017-06-09T04:47:21+5:30

पोलीस अधिकाऱ्यांसह सात पोलिसांचे पगार थांबविण्याची कारवाई कोल्हापूरच्या राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाने केली आहे.

The police stopped the salary of the accused | चोरी प्रकरणातील पोलिसांचे पगार थांबविले

चोरी प्रकरणातील पोलिसांचे पगार थांबविले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : वारणानगर (जि. कोल्हापूर) येथून सव्वानऊ कोटीच्या रकमेवर डल्ला मारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांसह सात पोलिसांचे पगार थांबविण्याची कारवाई कोल्हापूरच्या राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाने केली आहे. हे सातहीजण सांगली पोलीस दलात होते. त्यामुळे त्यांना तातडीने पकडा, असे आदेश सीआयडीने सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) विभागाला दिले आहेत.
मिरजेतील बेथेलहेमनगर येथे गतवर्षी एलसीबीने झोपडीवजा घरातून तीन कोटीची रोकड जप्त करुन मैनुद्दीन मुल्ला यास अटक केली होती. चौकशीत ही रक्कम त्याने वारणानगर येथून चोरल्याचे निष्पन्न झाले. सांगली एलसीबीने तपासाच्या नावाखाली मैनुद्दीनला वारणानगरला नेले. त्यानंतर तिथे पुन्हा कोट्यवधीचे घबाड सापडले. यातील दीड कोटीची रक्कम जप्त केली होती. पण त्याचवेळी सुमारे सव्वानऊ कोटीची रोकड एलसीबीच्या पथकाने हडप केल्याचे तब्बल एक वर्षानंतर उघडकीस आले. यामध्ये पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहाय्यक निरीक्षक सूरच चंदनशिवे, सहाय्यक फौजदार शरद कुरळपकर, हवालदार शंकर पाटील, कुलदीप कांबळे, दीपक पाटील, रवींद्र पाटील यांच्याविरुद्ध कोडोली (ता. पन्हाळा) पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हा तपास सीआयडी करीत आहे. अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. संशयितांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले आहेत.
>फरारी घोषितच्या हालचाली
न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर संशयित पोलीस शरण येतील, अशी सीआयडीला अपेक्षा होती. पण अजून एकही संशयित शरण आला नसल्याने सीआयडीकडून त्यांना फरारी घोषित करण्याच्या हालचाली सुरु आहेत.

Web Title: The police stopped the salary of the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.