अन पोलीस उपनिरीक्षकाची कॉलर झाली टाईट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 03:16 AM2019-01-07T03:16:44+5:302019-01-07T03:17:02+5:30
एखाद्या चांगल्या गुन्ह्याचे अन्वेषण पोलिसांनी किंवा गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकांनी केल्यानंतर त्याची पत्रकार परिषदेत माहिती देण्यात येते.
एखाद्या चांगल्या गुन्ह्याचे अन्वेषण पोलिसांनी किंवा गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकांनी केल्यानंतर त्याची पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त किंवा उपायुक्त पातळीवरील वरिष्ठ अधिकारी त्याची उकल कशी झाली आणि कोणते आरोपी अटक केले, याची सविस्तर माहिती देतात. नविन वर्षात ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ १ ठाणे शहरचे पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी शीळ डायघर पोलिसांनी उघडकीस आणलेल्या गोदामांच्या चोऱ्यांची पत्रकार परिषद ३ जानेवारी रोजी घेतली. आरोपी आणि त्यांच्या एमओबीची माहिती दिल्यानंतर त्यांनी अचानक हा तपास कसा झाला? याची माहिती तपास अधिकारी देतील, असे जाहीर केले. त्यावेळी सर्व वृत्त वाहिन्यांचे कॅमेरे आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या नजरा उपनिरीक्षकांकडे वळल्या. दोन टीमच्या दोन उपनिरीक्षकांनी तपास कसा केला, याची माहिती दिली.
एका बाजूला आपले वरिष्ठ असलेले उपायुक्त दुसºया बाजूला प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची गर्दी. एरव्ही, खड्या आवाजात बोलणाºया या अधिकाºयांचा आवाज एकदम गंभीर झाला. तशी त्यांनी ती माहिती काहीशी अडखळत सांगितली. पण, एकाचवेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसमोर बोलण्याची पहिलीच वेळ असल्याने काहीशी भंबेरी उडाल्याचे त्यांच्या चेहºयावरुन स्पष्ट जाणवत होते. त्यानंतर दुसºया उपनिरीक्षकाने माहिती देण्यास सुरुवात केली. त्यांचीही तीच अवस्था. पण त्यांनी माहिती देतांना खबºयांकडून गुन्हेगारांची टीप मिळाल्यापासून ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपायुक्त यांना माहिती दिल्यापर्यंतची सगळी माहिती सांगितली. त्यानंतर उपायुक्त स्वामी यांनी त्यांना कॅमेºयासमोर बोलतांना वरिष्ठांना माहिती दिल्याचे सांगू नका. सलग तपासाची माहिती द्या, असा सल्ला दिला. उपायुक्तांनीच उभारी दिल्याने त्यांची भीती काहीशी चेपली. पुन्हा एका टेकमध्ये त्यांनी ही माहिती दिली. ज्या अधिकाºयाने गुन्ह्याचा तपास केला. त्याचे त्याला श्रेय मिळण्याबरोबरच त्याने स्वत: माहिती दिल्यानंतर एक वेगळा आनंद आणि अनुभव येतो. यातून त्यांना प्रोत्साहित करणे हा त्यामागचा हेतू असल्याचे सांगून नविन वर्षात थेट तपास अधिकाºयानेच माहिती देण्याचा हा एक वेगळा पायंडा पाडणार असल्याचे स्वामी यांनी पत्रकारांना स्पष्ट केले. गुन्हेगारांना कसे पकडले, याची माहिती थेट उपायुक्त, सहायक आयुक्त यांच्या समोरच प्रसारमाध्यमांना सांगण्याची संधी मिळाल्यामुळे या दोन्ही अधिकाºयांची कॉलर चांगलीच टाईट झाली होती. पत्रकारांनीही स्वामी यांच्या या नव्या उपक्रमाचे कौतुक केल्यानंतर त्यांनीही हे श्रेय स्वत:कडे न घेता हा उपक्रम पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनीच राबविण्यास सांगितल्याचे स्पष्ट केले. ज्याने फिल्डवर जाऊन काम केले, त्याला त्याचे श्रेय मिळण्याबरोबरच त्याला प्रमोट करून त्याला प्रोत्साहनही मिळते, असाही आयुक्तांचा उद्देश असल्याचे ते म्हणाले.