वादग्रस्त ‘राधे मॉँ’ला पोलिसांचे समन्स

By admin | Published: August 10, 2015 01:14 AM2015-08-10T01:14:08+5:302015-08-10T01:14:08+5:30

तथाकथित वादग्रस्त आध्यात्मिक गुरू राधे माँ उर्फ सुखविंदर कौर हिच्यासमोरील अडचणी वाढत आहेत. एका विवाहितेचा हुंड्यासाठी छळ केल्याचा तिच्यावर आरोप आहे

Police summons to controversial 'Radhe Maa' | वादग्रस्त ‘राधे मॉँ’ला पोलिसांचे समन्स

वादग्रस्त ‘राधे मॉँ’ला पोलिसांचे समन्स

Next

मुंबई : तथाकथित वादग्रस्त आध्यात्मिक गुरू राधे माँ उर्फ सुखविंदर कौर हिच्यासमोरील अडचणी वाढत आहेत. एका विवाहितेचा हुंड्यासाठी छळ केल्याचा तिच्यावर आरोप आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी तिला चौकशीसाठी पाचारण केले आहे. रविवारी कांदिवली पोलिसांकडून त्याबाबतचे समन्स बजावण्यात आले आहे. तिला शुक्रवारी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले आहे.
कांदिवलीत राहत असलेल्या एका विवाहितेने १५ दिवसांपूर्वी छळप्रकरणी सासरच्या मंडळीसह राधे माँविरोधात तक्रार दिली आहे. त्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या राधे माँबद्दलचे अनेक किस्से उघड होत आहेत. राधे माँ रविवारी औरंगाबादहून विमानाने मुंबईत दाखल झाली. सायंकाळी कांदिवली पोलीस ठाण्यातील
दोघा कर्मचाऱ्यांनी तिच्या निवासस्थानी जाऊन चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस
बजाविली. (प्रतिनिधी)

Web Title: Police summons to controversial 'Radhe Maa'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.