विनायक मेटेंच्या कारचालकाला पोलीस ताब्यात घेणार; अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 03:28 PM2022-08-16T15:28:00+5:302022-08-16T15:28:17+5:30

विनायक मेटे यांच्या कार अपघात प्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांनी आणि कार्यकर्त्यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे

Police to detained Vinayak Mete's car driver; A new twist in the accident case | विनायक मेटेंच्या कारचालकाला पोलीस ताब्यात घेणार; अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट

विनायक मेटेंच्या कारचालकाला पोलीस ताब्यात घेणार; अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट

googlenewsNext

मुंबई - माजी आमदार आणि शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. शिवसंग्राम संघटनेच्या कार्यकर्त्याची ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर आता पोलिसांच्या तपासाला वेग आला आहे. विनायक मेटे यांचा कारचालक एकनाथ कदम सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. या अपघात प्रकरणी रसायनी पोलीस कदम यांना ताब्यात घेऊन चौकशी करणार आहेत. त्यामुळे विनायक मेटेंचा मृत्यू अपघात की घातपात या अँगलनं पोलीस तपास करत आहेत. 

विनायक मेटे यांच्या कार अपघात प्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांनी आणि कार्यकर्त्यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. मेटेंचा मृत्यू हॉस्पिटलमध्ये आणण्यापूर्वीच झाला होता. पोस्टमोर्टम रिपोर्टमधून सत्य बाहेर येईल असं त्यांच्या पत्नी ज्योती मेटे म्हणाल्या. तर पुण्यात ३ ऑगस्ट रोजी विनायक मेटे यांच्या कारचा २ वाहनांनी पाठलाग केला होता. त्यात एक आयशर ट्रक आणि एर्टिंगा होती. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. मेटे यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी ८ पथके नेमली आहे. या प्रकरणी ट्रक चालकाला दमन येथून ताब्यात घेण्यात आले आहे. तर दुसरीकडे विनायक मेटे यांच्या कारचालकालाही पोलीस ताब्यात घेणार असल्याची माहिती आहे. 

एकनाथ काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतोय
विनायक मेटे यांच्या अपघाताबाबत आम्हाला कळविण्यात आलेली वेळ आणि प्रत्यक्ष झालेल्या अपघाताची वेळ, यातील टाईम गॅपची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मेटेंच्या पत्नी ज्योती मेटे यांनी केली आहे. तसेच मला सुरुवातील विनायक मेटेंचा अपघात नेमका कुठे झाला आहे, हे कुणीही सांगत नव्हतं. चालकाशी बोलण्याचा प्रयत्न केला, तर तोही ठिकाण सांगू शकत नव्हता. सदर चालक गेल्या अनेक वर्षांपासून विनायक मेटेंसोबत होता. तो सातत्याने या मार्गावरुन विनायक मेटेंसोबत प्रवास करत होता. त्यामुळे त्या अपघाताचं ठिकाण सांगता येऊ न शकणं हे आश्चर्यकारक आहे. त्यामुळे मला या अपघाताबाबत संशय आहे. एकनाथ काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतोय असा दावा त्यांनी केला आहे. 

Web Title: Police to detained Vinayak Mete's car driver; A new twist in the accident case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.