पोलीस प्रशिक्षकांना यापुढे ३० टक्के वाढीव भत्ता
By admin | Published: December 19, 2015 02:13 AM2015-12-19T02:13:04+5:302015-12-19T02:13:04+5:30
पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षकांना मूळ वेतनावर ३० टक्के वाढीव भत्ता देण्याचा निर्णय गृहविभागाने घेतला आहे. त्यामुळे साईड पोस्टिंग समजल्या जाणाऱ्या प्रशिक्षण केंद्राला
- गृहविभागाचा निर्णय
मुंबई : पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षकांना मूळ वेतनावर ३० टक्के वाढीव भत्ता देण्याचा निर्णय गृहविभागाने घेतला आहे. त्यामुळे साईड पोस्टिंग समजल्या जाणाऱ्या प्रशिक्षण केंद्राला चांगले प्रशिक्षक मिळतील, अशी आशा प्रशासनाला आहे.
मुंबईतील मरोळ येथील प्रशिक्षण केंद्रासह राज्यात १३ प्रशिक्षण केंद्रे आहेत. त्यापैकी खंडाळा आणि नागपूर येथील केंद्रांत केवळ महिलांना प्रशिक्षण दिले जाते. दोन ते तीन वर्षे प्रशिक्षण कालावधीसाठी प्रशिक्षक म्हणून येण्यास पोलीस तयार नसतात. प्रशिक्षण केंद्रावर बदली झाल्यास अनेकदा अधिकारी नानाविध कारणे पुढे करून काम करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले.
त्यामुळे गृहविभागाने या प्रशिक्षण केंद्रात काम करणाऱ्या प्रशिक्षकांसाठी नववर्षाच्या आगमनापूर्वीच आनंदाची बातमी दिली आहे. मूळ वेतन आणि श्रेणीनुसार संबंधित प्रशिक्षकाला यावर ३० टक्के वाढीव भत्ता देण्यात येणार असल्याची माहिती पोलीस प्रवक्ते धनंजय कुलकर्णी यांनी दिली. या आदेशामुळे प्रशिक्षक म्हणून काम करण्यास अनेक जण पुढे येतील, असेही कुलकर्णी यांनी या वेळी सांगितले. (प्रतिनिधी)