महिलेला ठार मारण्याचा पोलिसांचा प्रयत्न

By Admin | Published: May 22, 2017 03:55 AM2017-05-22T03:55:15+5:302017-05-22T03:55:15+5:30

वरिष्ठांकडे तक्रार केल्याचा राग मनात ठेवत, वाहतूक शाखेच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी गाडीला धडक मारीत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नारणे

Police tried to kill the woman | महिलेला ठार मारण्याचा पोलिसांचा प्रयत्न

महिलेला ठार मारण्याचा पोलिसांचा प्रयत्न

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
चोपडा (जि. जळगाव) : वरिष्ठांकडे तक्रार केल्याचा राग मनात ठेवत, वाहतूक शाखेच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी गाडीला धडक मारीत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नारणे येथील सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सरोज धोंडू पाटील यांनी केला आहे.
ही घटना रविवारी सकाळी नीमगव्हाण गावाजवळ घडली. डॉ. पाटील जखमी झाल्या असून त्यांच्यावर चोपडा उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
१९ मे रोजी चोपड्याहून धरणगावकडे जात असताना निमगव्हाण
गावाशेजारी वाहतूक ठप्प झाली होती. दोघे पोलीस कर्मचारी ट्रक चालकाकडून पैसे घेत होते. मी विचारणा केल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोला, असे ते म्हणाले. मी वरिष्ठांकडे फोनवरुन तक्रार केली होती.
त्याच्या रागातून २१ रोजी संजय निंबा धनगर व अन्य एका पोलिसाने माझ्या विना क्रमांकाच्या दुचाकीला मोटारसायकलवरून येत जोरात धडक दिली. नंतर ते पळून गेले, अशी तक्रार पाटील यांनी दिली.

Web Title: Police tried to kill the woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.