व्हेरिफिकेशनसाठी पोलीस दारी

By Admin | Published: January 20, 2017 12:53 AM2017-01-20T00:53:32+5:302017-01-20T00:53:32+5:30

भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे पारपत्र (पासपोर्ट) काढण्यासाठीची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे.

Police Vendor for Verification | व्हेरिफिकेशनसाठी पोलीस दारी

व्हेरिफिकेशनसाठी पोलीस दारी

googlenewsNext


पिंपरी : भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे पारपत्र (पासपोर्ट) काढण्यासाठीची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. कागदपत्राच्या काही जाचक अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. आॅनलाइन अर्ज दाखल करण्यापासून ते शुल्क भरण्याची व्यवस्था आहे. पोलिसांचा पडताळणी अहवाल मिळविण्यासाठी पूर्वी पोलीस ठाण्यांत फेऱ्या माराव्या लागत होत्या. आता परिस्थिती उलट आहे. पासपोर्टकरिता अर्ज करणाऱ्या अर्जदारांच्या घरी व्हेरिफिकेशनसाठी स्वत: पोलीसच जाऊ लागले आहेत.
परदेशात पर्यटनासाठी, उच्च शिक्षण आणि नोकरीनिमित्त जाणाऱ्यांना पारपत्राची (पासपोर्ट) आवश्यकता भासते. पासपोर्ट काढण्यासाठी जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी पुराव्यादाखल जोडावी लागणारी कागदपत्रे, विवाहनोंदणीचे प्रमाणपत्र अशी महत्त्वाची कागदपत्रे जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामध्ये काही प्रमाणात शिथिलता आणली असून, जन्मदाखला नसेल, तर शाळा अथवा महाविद्यालय सोडल्याचा दाखला जोडावा,अशी नव्या नियमावलीनुसार सवलत दिली आहे. एवढेच नव्हे, तर विवाहनोंदणीचे प्रमाणपत्र जोडलेच पाहिजे,अशी सक्ती नाही. अशा प्रकारे काही नियम, अटी शिथिल करण्यात आल्या आहेत.
आॅनलाइन अर्ज, तसेच शुल्क सादर करून अपॉइंटमेंट घ्यायची. पारपत्र कार्यालयाकडून निश्चित केलेल्या वेळेत जाऊन मूळ कागदपत्रे सादर करायची. त्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशन होणार. नंतर काही दिवसांत पोस्टामार्फत अर्जदाराला पासपोर्ट मिळतो, अशी ही प्रक्रिया आहे. ज्याला आयुष्यात कधीच पोलीस ठाण्याची पायरी चढण्याची वेळ आली नाही, अशा लोकांनाही पासपोर्ट मिळविण्यासाठी पोलीस ‘व्हेरिफिकेशन’करिता पोलीस ठाण्याच्या चकरा माराव्या लागत होत्या. आता चकरा थांबणार असून, पोलीसच पत्ता शोधत घरी येणार आहेत. (प्रतिनिधी)
।पोलिसांना ‘जीपीएस’ची मदत...
पोलीस स्टेशनला व्हेरिफिकेशनसाठी जाणा-या नागरिकांनाही काही कटू अनुभवांना सामोरे जावे लागत होते. यापुढे व्हेरिफिकेशनसाठी स्वत: पोलीसच अर्जदाराच्या घरी जाणार आहेत. अर्जदाराचा पत्ता शोधण्याचे काम कठीण आहे. ते सुलभ व्हावे, यासाठी पोलीस मोबाइलमधील जीपीएस यंत्रणेचा वापर करून अर्जदाराचा पत्ता शोधू लागले आहेत. पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी पोलीसच आपल्या दारी अशी परिस्थिती सध्या आहे.

Web Title: Police Vendor for Verification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.