पोलिसांकडून १३ हजार उत्तरपत्रिकांची पडताळणी

By admin | Published: April 15, 2015 01:19 AM2015-04-15T01:19:43+5:302015-04-15T01:19:43+5:30

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात अमरावती शहर पोलिसांनी आरंभलेल्या उत्तरपत्रिका पडताळणी मोहिमेदरम्यान सोमवारी १३ हजार ५०० उत्तरपत्रिकांची पडताळणी केली़

Police verification of 13 thousand ballot papers | पोलिसांकडून १३ हजार उत्तरपत्रिकांची पडताळणी

पोलिसांकडून १३ हजार उत्तरपत्रिकांची पडताळणी

Next

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात अमरावती शहर पोलिसांनी आरंभलेल्या उत्तरपत्रिका पडताळणी मोहिमेदरम्यान सोमवारी १३ हजार ५०० उत्तरपत्रिकांची पडताळणी केली़ दरम्यान अभियांत्रिकीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (एमई) १३ उत्तरपत्रिकांमध्ये खाडाखोड असल्याचा संशय पोलिसांना आहे.
गुणवाढ प्रकरणात पोलिसांनी मार्च महिन्यात सर्वप्रथम १२ उत्तरपत्रिका जप्त केल्या होत्या. त्यानंतर आणखी चार उत्तरपत्रिकांमध्ये खाडाखोड झाल्याचे निदर्शनास आले. व्यापकता शोधण्यासाठी पोलिसांनीच उत्तरपत्रिका पडताळणीचे कार्य सोमवारपासून हाती घेतले. दरम्यान आढळून आलेल्या १३ संशयास्पद उत्तरपत्रिकांमुळे एकूण उत्तरपत्रिकांची संख्या २९ झाली आहे. संशयास्पद उत्तरपत्रिकांमध्ये वाढत होत चालली आहे.
संशयास्पद १३ उत्तरपत्रिका सद्यस्थितीत विद्यापीठ प्रशासनाच्या ताब्यात आहेत. अणखी काही उत्तरपत्रिकांची तपासणी केल्यावर सर्व संशयित उत्तरपत्रिका एकाचवेळी गैरव्यवहार शोध समितीकडे पुनर्तपासणीकरिता हस्तांतरीत करण्यात येतील, अशी माहिती पोलिसांनी दिली़ (प्रतिनिधी)

उत्तरपत्रिका तपासणीत विद्यापीठाचे संपूर्ण सहकार्य पोलिसांना आहे. गुणवाढीसंबंधिचे वास्तव बाहेर येणे गरजेचे आहे. संशयित उत्तरपत्रिका गैरव्यवहार शोध समितीकडे पाठविण्यात येतील.
- जे.डी.वडते, परीक्षा नियंत्रक, अमरावती विद्यापीठ.

पहिल्या दिवशी १३,५०० उत्तरपत्रिकांची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये १३ उत्तरपत्रिकांत संशयास्पद कृत्य आढळून आलेले आहे. विद्यापीठातील गैरव्यवहार शोध समिती उत्तरपत्रिकांची पुन्हा तपासणी करेल. त्यानुसार पुढील कारवाई ठरेल.
- सोमनाथ घार्गे, पोलीस उपायुक्त

च्न्यायालयाने प्रफुल्ल उईके व अरविंद डोंगरे याला १६ व महेंद्र दमकेला १९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तिघांचीही पोलीस कोठडीत कसून चौकशी सुरू आहे.

Web Title: Police verification of 13 thousand ballot papers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.