बदलती आव्हाने स्वीकारण्यासाठी पोलीसांना बदलावे लागेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By admin | Published: June 8, 2016 09:01 AM2016-06-08T09:01:36+5:302016-06-08T10:31:41+5:30
देशांतर्गत बाह्यशक्तीचे आक्रमण वाढले असून, स्ट्रीट गुन्हेगारीबरोबरच सायबर गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Next
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. ८ - पोलीस हा डिसिजन फोर्स असून, बदलती आव्हाने स्वीकारण्यासाठी पोलीसांना बदलावे लागेल. देशांतर्गत बाह्यशक्तीचे आक्रमण वाढले असून, स्ट्रीट गुन्हेगारीबरोबरच सायबर गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या ११३ व्या तुकडीच्या दीक्षांत सोहळयात बोलताना म्हणाले.
सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी आपल्या अधिकाराचा वापर करा. पोलिसांसाठी सुविधा कमी असल्या तरी आहे त्या परिस्थितीत पोलीसाना कायदा सुवयास्थेचे पालन करावे लागेल असे फडणवीस यांनी सांगितले. मीना भीमसिंग तुपे या महिला पोलिसाला बेस्ट ट्रेनी ऑफ द बॅचच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १० पैकी सात महिला उपनिरीक्षकाना सुवर्णपदक मिळाले.
महाराष्ट्र पोलिस अकादमीतील ११३ व्या तुकडीच्या दीक्षांत सोहळा गुरुवारी पार पडला. या सोहळयासाठी मुख्यमंत्री फडणवीस नाशिकमध्ये आले आहेत. ११३ व्या तुकड़ीत ७४९ प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक असून, ५०३ पुरुष तर २४६ महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
कमांडर प्रियंका राजेन्द्र गोरे दीक्षांत संचलन परेडचे नेतृत्व केले. रविंद्रकुमार वैजनाथ वारुंगले सेकण्ड इन कमांडर आहेत. पालकमंत्री गिरीश महाजन, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, राम शिंदे, पोलीस महासंचालक प्रवीण दिक्षित, संचालक नवल बजाज या सोहळयाला उपस्थित आहेत.
प्रशिक्षणार्थी पोलीस आधिका-यांणध्ये ६१७ पदवीधर, ९८ पदव्युत्तर पदवी, दोन अॅग्रीकल्चर ,२२ अभियंते आणि १० डॉक्टर आहेत.