पोलिसांची किटपेटी निवृत्तीनंतरही त्यांच्या सोबत राहणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 09:03 PM2017-08-17T21:03:57+5:302017-08-17T21:07:32+5:30
पोलीस दलात रुजू झाल्यापासून सेवानिवृत्तीपर्यतच्या दिर्घप्रवासापर्यत अधिकारी व अंमलदारांच्या सोबत असणारी किट पेटी (ट्रंक) आता आयुष्यभर त्यांच्यासोबत राहणार आहे. निवृत्तीनंतर ती पोलीस मुख्यालयात जमा करण्याची सक्ती रद्द करण्यात आली आहे. ३०-३५ वर्षाच्या प्रवासात सोबत असणाºया पेटीशी भावनिक नाते जोडले गेल्याने रिटायरमेटनंतर त्यांना भेट स्वरुपात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- जमीर काझी
मुंबई, दि. 17 - पोलीस दलात रुजू झाल्यापासून सेवानिवृत्तीपर्यतच्या दिर्घप्रवासापर्यत अधिकारी व अंमलदारांच्या सोबत असणारी किट पेटी (ट्रंक) आता आयुष्यभर त्यांच्यासोबत राहणार आहे. निवृत्तीनंतर ती पोलीस मुख्यालयात जमा करण्याची सक्ती रद्द करण्यात आली आहे. ३०-३५ वर्षाच्या प्रवासात सोबत असणाºया पेटीशी भावनिक नाते जोडले गेल्याने रिटायरमेटनंतर त्यांना भेट स्वरुपात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पोलीस मुख्यालयात मध्यवर्ती पोलीस कल्याण निधी समन्वय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्य पोलीस दलातील दोन लाखावर पोलीस अंमलदारांना आठवण म्हणून भेट स्वरुपात आपल्याजवळ बाळगता येणार आहे.
खात्यात भरती झाल्यानंतर प्रशिक्षणाला हजर झाल्यानंतर प्रत्येक पोलीस उपनिरीक्षक व कॉन्स्टेबलना खात्याकडून मिळालेले गणवेष किट ठेवण्यासाठी लोखंडी मजबूत पेटी दिली जाते. त्याला गणवेष किट असे संबोधण्यात येते. अंमलदारांने गणवेष, टोपी, बॅँच, लाईन यार्ड, पट्टा तसेच दैनदिन वापरासाठी लागणारे साहित्य त्याला एकत्र ठेवता यावी, जेणेकरुन नियुक्तीच्या ठिकाणी गेल्यास त्याला आवश्यक साहित्य सहजपणे उपलब्ध व्हावे, हा त्यामागचा हेतू आहे. ब्रिटीश काळापासून ही पद्धत अनुसरली जात आहे. बंदोबस्ताच्या ठिकाणी, तसेच पोलीस ठाण्यात ठेवल्यानंतर आपली किट पेटी खराब होवू नये तसेच सहजपणे ओळखली जावी, यासाठी त्याला रंगवून आपले नाव व बक्कल नंबर लिहून ठेवतात. खात्यात कार्यरत असेपर्यत सुमारे ३५,३८ वर्षे ही पेटी सोबतच ठेवत असतात. अंमलदार असल्याने त्यांना नियुक्तीच्या ठिकाणी स्वतंत्र खोली मिळू शकत नाही. त्यामुळे या गणवेष कीटमध्ये ते आपले साहित्य ठेवत असतात.
अधिक वाचा
- शौर्य पदक प्राप्त पोलीस अधिकारी, कर्मचाºयांचा सन्मान
- पोलीस वसाहतीत डेंग्यूसदृश आजाराची लागण
मात्र पोलीस रिटायर झाल्यानंतर त्यांना ती कार्यरत असलेल्या पोलीस मुख्यालयात जीर्ण व जुनी झालेली लोखंडी पेटी जमा करणे बंधनकारक असते. त्याशिवाय त्यांना सेवानिवृत्तीनंतरच्या सुविधा उपलब्ध होत नाहीत. पोलीस दलाची आठवण म्हणून ती आपल्या सोबत रहावी, अशी अंमलदारांची इच्छा असते. त्यामुळे ती अंमलदारांना देण्यात यावी, अशी मागणी नांदेडमधील सहाय्यक फौजदार ढगे यांनी केली होती. मध्यवती व्यवस्थापन समितीच्या बैठकीमध्ये या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी पोलीस नियमावलीतील भाग २ नियम १०(५) मधील तरतुदीनुसार घटकप्रमुखांनी त्याबाबत निर्णय घ्यावा, कीटपेटी इतरांना वापरण्या योग्य नसल्यास ती संबंधित अंमलदारांकडे राहू देण्यात यावी, असे निर्देश दिले.
पोलिसांना किटपेटी सदैव वापरावी लागत असल्याने त्याच्याशी एक भावनिकता निर्माण झालेली असते.इतक्या वर्षानंतर ती दुसºयाला वापरण्याजोगे नसल्याने ती संबंधित कर्मचाºयाला देण्याबाबत घटकप्रमुखांना अधिकार देण्यात आला आहे.
-सतीश माथूर (पोलीस महासंचालक)