गोशाळेत ट्रक नेताना पोलिसाला धक्काबुक्की
By admin | Published: September 12, 2016 04:14 AM2016-09-12T04:14:40+5:302016-09-12T04:14:40+5:30
गुरे घेऊन जाणारा ट्रक गोशाळेत घेऊन जाणाऱ्या पोलिसाला जमावाने धक्काबुक्की केल्याची घटना बोराडी (ता. शिरपूर) येथे शुक्रवारी रात्री घडली.
धुळे : गुरे घेऊन जाणारा ट्रक गोशाळेत घेऊन जाणाऱ्या पोलिसाला जमावाने धक्काबुक्की केल्याची घटना बोराडी (ता. शिरपूर) येथे शुक्रवारी रात्री घडली. रविवारी त्याबाबत ५० ते ६० जणांविरूद्ध शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला.
जमावाने पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करत ट्रकच्याही काचा फोडल्या़ शिरपूर तालुका पोलिसांनी शुक्रवारी मुंबई- आग्रा महामार्गावर दहिवद साखर कारखान्यासमोर परवाना नसताना गुरांची वाहतूक करणाऱ्या ट्रकला पकडले होेते़ पोलिसांनी आठ गुरे ताब्यात घेत चालक पुनमचंद तोलाराम शर्मा (रा़ शेतपुरा, जि़ बिकानेर) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला होता़
त्याचदिवशी रात्री ही गुरे पोलीस कर्मचारी ट्रकने वाडी गावातील गोशाळेत घेऊन जात होते़ त्यावेळी ५० ते ६० लोकांच्या जमावाने बोराडी गावाजवळ पोलिसाचे वाहन व ट्रकचा रस्ता अडविला. पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की, शिवीगाळ करून ट्रकच्या काचा फोडल्या. (प्रतिनिधी)