रहिवाशांना बाहेर काढण्याची जबाबदारी पोलिसांची

By admin | Published: June 25, 2014 03:01 AM2014-06-25T03:01:20+5:302014-06-25T03:01:20+5:30

मुंबईतील अतिधोकादायक इमारतीमधील रहिवासी महापालिकेने नोटीस देऊनही घर खाली करत नसल्यास पोलिसांनी त्यांना इमारतीमधून बाहेर काढावे, असे उच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केल़े

Police's responsibility to evacuate the residents | रहिवाशांना बाहेर काढण्याची जबाबदारी पोलिसांची

रहिवाशांना बाहेर काढण्याची जबाबदारी पोलिसांची

Next
>अमर मोहिते - मुंबई
मुंबईतील अतिधोकादायक इमारतीमधील रहिवासी महापालिकेने नोटीस देऊनही घर खाली करत नसल्यास पोलिसांनी त्यांना इमारतीमधून बाहेर काढावे, असे उच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केल़े उच्च न्यायालयाच्या या निर्देशामुळे अनेक धोकदायक इमारतींमधील रहिवाशांना आता बळाचा वापर करुन बाहेर काढले जाऊ शकते.
मात्र यासाठी बलप्रयोग करण्याची आवश्यकता असली तरच करावी़ तसेच कारवाई करताना त्या रहिवाश्यांच्या घरगुती साहित्याला धक्का लागणार नाही याची काळजीही पोलिसांनी घ्यावी, असेही न्यायालयाने नमूद केले आह़े
विशेष म्हणजे अशा रहिवाश्यांना इमारतीतून बाहेर काढण्यासाठी न्यायालयानेच मार्गदशर्कतत्त्वे जारी करावीत, अशी विनंती करणारा अर्ज स्वत: पालिकेने न्यायालयात सादर केला होता़ त्याची दखल घेत न्यायालयाने यासाठी मार्गदर्शकतत्त्वे जारी केली आहेत़ 
न्यायालय म्हणाले,अतिधोकायदक इमारतीतील रहिवासी  घराबाहेर न पडल्याने इमारत अचानक कोसळते व यात अनेकांचा बळी जातो़ हे टाळण्यासाठी मार्गदर्शकतत्त्वे जारी करणो आवश्यक आहेत़ तसेच ही मार्गदर्शकतत्त्वे केवळ अतिधोकादायक इमारतींसाठीच लागू होणार आहेत़
 
च्पाहाणी केल्यानंतरच पालिकेने इमारत अतिधोकादायक आहे की नाही हे जाहिर करावे व त्याची माहिती पालिकेच्या व राज्य शासनाच्या संकेतस्थळावर  प्रसारीत करावी़
च्या पाहाणीवर रहिवाश्यांचा आक्षेप असल्यास पालिकेने यासाठी तज्ज्ञ समिती नेमावी़
च्त्यानंतर इमारत अतिधोकायद असल्याचे स्पष्ट झाल्यावर तेथील घरांची व भूखंडाची मोजपाम करावी़
च्नंतर रहिवाश्यांना घरे खाली करण्याची नोटीस द्यावी़
 
च्त्यापाठोपाठ वीज, पाणी व गॅसचे कनेक्शन तोडाव़े
च्तरीही रहिवासी घराबाहेर पडत नसल्यास पोलिसांनी त्यांना घरा बाहेर काढाव़े
च्हे करत असताना आवश्यक असल्यास बल प्रयोग करावा व रहिवाश्यांच्या घरगुती साहित्यांना धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी़
च्कारवाई आधीच इमारत त्याची जबाबदारी निश्चित करण्यासाठी उच्चपदस्थ अधिका:यांची समिती नेमावी़
च्यासह न्यायालयाने यासाठी इतरही मार्गदर्शकतत्त्वे जारी केली आहेत़
 

Web Title: Police's responsibility to evacuate the residents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.