Nawab Malik vs Devendra Fadnavis: दिवाळीत राजकीय फटाकेबाजी! नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचे भुईनळे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 07:01 AM2021-11-02T07:01:14+5:302021-11-02T07:01:50+5:30

Nawab Malik vs Devendra Fadnavis on Sameer Wankhede: भाजपचे किरीट सोमय्या यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या. आता राष्ट्रवादी व भाजपकडून मुख्य नेत्यांना टार्गेट केले जात आहे. 

Political fireworks on Diwali! Allegations between Nawab Malik and Devendra Fadnavis | Nawab Malik vs Devendra Fadnavis: दिवाळीत राजकीय फटाकेबाजी! नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचे भुईनळे

Nawab Malik vs Devendra Fadnavis: दिवाळीत राजकीय फटाकेबाजी! नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचे भुईनळे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ऐन दिवाळीत महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांची जोरदार आतषबाजी सुरू झाली असून, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा ड्रग्ज विक्रेत्यांशी संबंध असल्याचा गंभीर आरोप करीत या प्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते व अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी केली, तर त्यावर, ‘नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असून, त्याबाबतचा बॉम्ब दिवाळीनंतर फोडू,’ असे फडणवीस यांनी जाहीर केले. 

भाजपचे किरीट सोमय्या यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या. आता राष्ट्रवादी व भाजपकडून मुख्य नेत्यांना टार्गेट केले जात आहे. फडणवीस यांचे ड्रग्ज पेडलरशी संबंध असल्याचा मलिक यांचा आरोप खोटा आहे, त्यात तथ्य आढळल्यास मी राजकीय संन्यास घेईन, असे आव्हान मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. मंगलप्रभात लोढा यांनी दिले.

पाकमध्ये बॉम्ब फोडण्याची देश वाट पाहतोय : मुख्यमंत्री
nदेवेंद्र फडणवीस-नवाब मलिक यांच्यातील वाक‌् युध्दाबाबत विचारले असता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी प्रश्न टोलवला. 
n‘काही जण म्हणताहेत की 
दिवाळीनंतर बॉम्ब फोडू; पण राजकीय बॉम्ब फोडायला दिवाळी लागत नाही. पाकिस्तानमध्ये बॉम्ब कधी फोडणार, याची देश वाट पाहात आहे, अशी कोटी मुख्यमंत्र्यांनी केली.

फडणवीस आणि ड्रग्ज विक्रेते यांच्या संबंधांची चौकशी करा
मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या संरक्षणाखाली ड्रग्जचा व्यवसाय चालला. त्यांच्या ड्रग्ज विक्रेत्यांशी असलेल्या संबंधांची न्यायालयीन चौकशीची मागणी नवाब मलिक यांनी सोमवारी केली. अटकेत असलेला ड्रग्ज विक्रेता जयदीप राणाचे देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता यांच्याबरोबरचे फोटो जारी करीत मलिक यांनी लवकरच आणखी मोठे खुलासे करणार असल्याचे सांगितले. 
मलिक म्हणाले की, फडणवीस मुख्यमंत्री असताना अमृता फडणवीस यांनी नदी संरक्षण अभियानांतर्गत एक गाणे तयार केले. मलिक यांनी फडणवीस व राणा यांचा गणपती दर्शन घेतानाचा फोटो दाखवला. अमृता फडणवीस यांच्यासोबतचा राणा यांचा फोटो ट्विट केला. दोघेही एकमेकांना 
चांगले ओळखत असल्याचे नवाब मलिक म्हणाले.

अमृता यांच्याबरोबरच देवेंद्र फडणवीस आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही या गाण्यात अभिनय केला होता. या गाण्याचे फायनान्स हेड जयदीप राणा होते. त्यामुळे जयदीप राणांना आपण ओळखत नाही, अशी पळवाट भाजपच्या नेत्यांना आता घेता येणार नाही. 
- नवाब मलिक

नवाब यांचे अंडरवर्ल्डशी संबंध, दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार
मुंबई : ‘मलिक यांनी लवंगी फटाका फोडला असला तरी दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडीन. त्यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत व त्याचे सर्व पुरावे मी माध्यमांसमोर उघड करीन आणि शरद पवार यांनासुद्धा देईन’, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला.
फडणवीस म्हणाले की, मलिक यांचा खोटारडेपणा यापूर्वीही उघड झाला आहे. त्यामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागला. मी कधीही विनापुरावे आरोप केले नाहीत व केलेले कोणतेही आरोप मी मागे घेतलेले नाहीत. ‘मै काच कें घर में नहीं रहता’. केवळ आणि केवळ एनसीबी दबावात यावी आणि स्वत:चा जावई सुटावा, यासाठी मलिक यांचा संपूर्ण आटापिटा सुरू आहे. त्यांनी पत्नी अमृता हिचा एक सेल्फी जारी केला. रिव्हर मार्च या संस्थेने प्रसार अभियानासाठी एक कटेंट टीम भाडेतत्त्वावर घेतली होती. 

रिव्हर मार्चसोबत आलेल्या कुणाशीही आमचा संबंध नाही. त्यांनी माझ्यासोबतही फोटो काढले होते. नीरज गुंडे मुख्यमंत्री ठाकरे यांचेही मित्र आहेत. ते दररोज राष्ट्रवादीचेच घोटाळे बाहेर काढतात, हिंमत असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी. वाझे पाळण्याची सवय त्यांना आहे, आम्हाला नाही.
- देवेंद्र फडणवीस 

Web Title: Political fireworks on Diwali! Allegations between Nawab Malik and Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.