कारभारावरून रंगला राजकीय फड

By admin | Published: October 2, 2014 01:29 AM2014-10-02T01:29:36+5:302014-10-02T01:29:36+5:30

‘मला लकवा भरल्याचा आरोप राष्ट्रवादीने वारंवार केला़ मी निष्क्रिय असल्याचे व जनतेची कामे करीत नसल्याचेही त्यांनी वारंवार सांगितले;

Political flame | कारभारावरून रंगला राजकीय फड

कारभारावरून रंगला राजकीय फड

Next
़़तर तुमचे अवघड होईल 
क:हाड (जि़ सातारा) : ‘मला लकवा भरल्याचा आरोप राष्ट्रवादीने वारंवार केला़ मी निष्क्रिय असल्याचे व जनतेची कामे करीत नसल्याचेही त्यांनी वारंवार सांगितले; पण मी त्याला कधीही प्रत्युत्तर दिले नाही़ त्यामुळे मी तोंड उघडलं तर तुम्हाला अवघड जाईल, असा इशारा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसला दिला़ 
माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, राष्ट्रवादीने माङयावर वारंवार आरोप केले, मात्र मी कधीही प्रत्युत्तर दिले नाही़ अखेरच्या दोन महिन्यांत मी फक्त जनतेच्या हिताची कामे केली़ आतार्पयत जनतेच्या हिताचेच निर्णय घेतले आहेत़ मात्र मी काहीच केले नसल्याचा, निष्क्रिय असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून केला जातो़ आमच्या फायली अडविल्या, असं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे; पण कुठल्या फायली अडविल्या हे ते सांगत नाहीत़ त्यांनी ते स्पष्टपणो सांगाव़े जनतेलाही मी कोणत्या फायली अडविल्या ते माहिती होईल़
राष्ट्रवादीची भाजपाशी छुपी युती आह़े  अजित पवारांनी माङयावर जे आरोप केले, ते चुकीचे आहेत़ त्यांच्या आरोपात कोणतेही तथ्य नाही़ अजित पवारांना त्रस देण्याच्या उद्देशाने मी कोणतीही कृती केलेली नाही़ सिंचन कमी प्रमाणात झाल्याच्या तक्रारी होत्या़ त्यामुळे त्या तक्रारींचा विचार करून चौकशी करण्याचा निर्णय घेतला़ सिंचनाची श्वेतपत्रिका काढली म्हणजे तेथे घोटाळा झाला आहे, असे नव्हे आणि ती श्वेतपत्रिका मी काढलेली नव्हती़ सिंचन विभागानेच ती श्वेतपत्रिका काढली होती़ (प्रतिनिधी)
 
च्‘कुणाचेही कुटुंब उद्ध्वस्त करण्याचे काम मी केलेले नाही़ जे काही झाले, ते जनतेला माहिती आह़े पक्षाने मला क:हाड दक्षिणची उमेदवारी दिली़ सेनापतीने पुढे राहणो गरजेचे असल्यामुळेच ही निवडणूक लढण्याचा मी निर्णय घेतला़,’ असेही चव्हाण म्हणाले.
 
‘क्लीअर‘ झालेल्या फायलींची चौकशी व्हावी!
मुंबई : गेली चार साडेचार वर्षे निर्णय न घेता बाजूला पडून असलेल्या नगरविकास खात्यातील अनेक फायली गेल्या दोन महिन्यांत अचानक कशा क्लीअर झाल्या याचेच आपल्याला आश्चर्य वाटते आहे. माहितीच्या अधिकारात मी त्यांची माहिती घेतोय. जर यात काही काळेबेरे असेल तर त्याची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी करीत माजी उपमुख्यमंत्नी अजित पवार यांनी माजी मुख्यमंत्नी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर तोफगोळा टाकला.
माङया राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे आघाडी झाली नाही असा आरोप ते करतात़ मग पंतप्रधान कार्यालयातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्नी होण्याच्या त्यांच्या इच्छेला काय ‘चेटकिणीची’ महत्त्वाकांक्षा म्हणायचे काय, 
असा खरमरीत सवालही 
त्यांनी केला. दक्षिण कराडमधून पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात उभे राहिलेल्या विलासकाका उंडाळकर यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्याचेही त्यांनी जाहीर केले. (विशेषप्रतिनिधी)
 
मी कोणतीही चूक केलेली नाही
च्सिंचन प्रकरणात मला गोवण्याचा प्रयत्न झाला. एसआयटीपासून आयोगही नेमण्यात आले, पण काही आढळले नाही. माङयाकडे विविध अधिका:यांपासून ते सचिवपातळीवर सर्व तपासल्यानंतरच ज्या नियमानुकूल फायली आल्या त्यांच्यावरच मी सही केली. मंत्नी म्हणूान माझा विशेषाधिकार वापरून एकाही प्रकरणात मी निर्णय घेतला नसल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.मात्र या प्रकरणात श्वेतपत्रिका काढण्याची घोषणा करून पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोधकांच्या हातात कारण नसताना कोलीत दिल्याचेही ते म्हणाले.
 
विलासकाका उंडाळकरांना पाठिंबा
दक्षिण कराड मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाण उभे आहेत. त्यांच्या विरोधात विलासकाका उंडाळकर यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्याचेही अजित पवार यांनी जाहीर केले. कराडमध्ये जाऊन आपण प्रचार करणार असल्याचेही ते म्हणाले. पृथ्वीराज चव्हाण हे विधान परिषदेचे सदस्य आहेत, म्हणजे विलासकाकांना मत दिलेत तर कराडकरांना काकांच्या रूपाने दुसरा आमदार मिळेल, असा युक्तिवाद त्यांनी केला.
 
काँग्रेससोबत आघाडी राहावी, यासाठी मी प्रयत्न केले. 144 या संख्येवर मी अडून बसलेलो नव्हतो. अशोक चव्हाणांचा मला फोन आला तेव्हा आम्हाला 134 जागाही चालतील, असे मी म्हटले होते. अखेरचा उपाय म्हणून राष्ट्रवादीकडून मी आणि काँग्रेसकडून नारायण राणो असे दोघेच जण चर्चेला बसतो आणि निर्णय घेतो, अशीही ऑफर मी दिली होती.
 
शिवसेना कधी संपणार नाही
शिवसेना हा राजकीय पक्ष आहे.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर ती उभी राहिलेली आहे. शिवसेनाप्रमुखांनंतर शिवसेना संपणार, असे बोलले जात होते. मात्न या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे जास्त खासदार निवडून आले. शिवसेना कधी संपणार नाही, असेही अजित पवार यांनी सांगितले.

 

Web Title: Political flame

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.