ओल्या दुष्काळात 'कोरडे' आश्वासन; राजकीय नेत्यांचे नुसतेच दौरे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 02:18 PM2019-11-06T14:18:07+5:302019-11-06T14:18:30+5:30
अडचणीत आलेले शेतकरी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलत आहे.
मुंबई :राजकीय पक्षात सूर असलेल्या सत्तासंघर्षामुळे राज्यात निर्माण झालेल्या ओल्या दुष्काळाकडे दुर्लक्ष होत असल्याचे आरोप होत आहे. राज्यभर मंत्र्यांचे,नेत्यांचे दौरे सूर असले तरीही प्रत्यक्ष मदत अजूनही शेतकऱ्यांपर्यंत पोहचली नाही. अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेले शेतकरी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलत आहे. राज्यभर मंत्र्यांचे,नेत्यांचे दौरे सूर असले तरीही प्रत्यक्ष मदत अजूनही शेतकऱ्यांपर्यंत पोहचली नाही.
राज्यात परतीच्या पावसाने हाहा:कार माजवला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या पिकाचं नुकसान झालं आहे. तर दुसरीकडे सरकारच स्थापन न झाल्याने शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर मदत मिळत नसल्याने अडचणीत आलेले शेतकरी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील एकट्या सिल्लोड तालुक्यात ओल्या दुष्काळामुळे चार शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे.
अवकाळी पावसाने नुकसान झाले म्हणून गेल्या दोन दिवसात खानदेशात 4 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर औरंगाबादमधील 35 वर्षीय गजानन जोशी यांनी अतिवृष्टी आणि पिंकाचे अतोनात नुकसान झाल्याने हाताश होऊन खेळणा नदीत उडी घेऊन जीवन यात्रा संपवली.कर्ज कसे फेडावे व रब्बीच्या पेरणीसाठी पैसे कुठून आणावे याची चिंता त्यांना होती. त्यामुळे त्यांनी नैराश्यातून आपली जीवन यात्रा संपवली,असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्यातील मंत्री,आमदार,खासदार दौरे करत आहे. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना अजूनही कोणतेही मदत जाहीर झालेली नाही. खिशातील आहे ते पैसे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी आधीच खर्च केली आहेत. त्यामुळे आता सरकारच्या मदतीची अपेक्षा शेतकऱ्याला लागली आहे.