प्रशांत ठाकूरांच्या भूमिकेमुळे पनवेल मतदारसंघात राजकीय अशांतता
By admin | Published: September 13, 2014 10:39 PM2014-09-13T22:39:39+5:302014-09-13T22:39:39+5:30
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रशांत ठाकूर यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेस पक्षाला धक्का दिला.
Next
पनवेल : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रशांत ठाकूर यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेस पक्षाला धक्का दिला. ठाकूरांच्या या भूमिकेमुळे रायगडच्या राजकारणात अशांतता निर्माण झाली असून विरोधकांचीही चलबिचल सुरू झाली आहे. रविवारी होणा:या बैठकीत काय निर्णय होते याकडे सर्वाचे लक्ष लागले असले तरी ठाकूर यांनी निवडणुक लढावी अशा आग्रह कार्यकत्र्याकडून होत आहे.
पनवेल, उरण, कजर्त आणि खालापूर पट्टयात पक्ष अधिक बळकट होत असताना प्रशांत ठाकूर यांचा आमदारकीचा राजीनामा परिणामकारक ठरेल,असे मत
राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे. सामाजिक दृष्टीकोनातून सत्ताधारी आमदाराने मागणी करूनही त्याबाबत सरकारने उदासनिता दाखवणो अतिशय क्लेशदायक असल्याचे स्थानिक काँग्रेस कार्यकत्र्याचे म्हणणो आहे. गेल्या पाच वर्षात मुख्यमंत्री किंवा कोणत्याही मंत्र्याकडे ठाकूर वैयक्तिक कामासाठी गेले नाहीत त्यांनी जनहिताचीच मागणी केली असे अनेक मंत्र्यांनी पनवेलमध्ये येऊन जाहीर कबुली दिली असल्याचे एका नगरसेवकाने नाव न छापण्याच्या अटीवर लोकमतला सांगितले.
ठाकूर यांच्या ऐवजी दुस-या उमेदवाराला किती प्रतिसाद मिळतो त्याचबरोबर कार्यकर्ते त्याचे काम प्रामाणिकपणो करतील की नाही यावर चर्चा सुरू आहे. रविवारी पनवेल शहर आणि तालुका काँग्रेस कमिटीची बैठक बोलावण्यात आली असून यावेळी पदाधिकारी आणि कार्यकत्र्याची म्हणणो ऐकून घेतले जाईल. त्यानंतर काय भूमिका घ्यायची त्याचबरोबर अगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भातही चर्चा होणार आहे. असे असले तरी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी अधिक आक्रमक झाले आहेत. ज्या पक्षात जनहिताला किंमत नाही त्यात राहायचे कशाला असे एका बडया पदाधिका:यांनी सांगितले. (वार्ताहर)
मित्र आणि विरोधी पक्षाचेही लक्ष
प्रशांत ठाकूरांनी निवडणूक न लढवल्यास पनवेलची राजकीय समिकरणो बदलतील. विरोधी पक्षाला त्यामुळे निवडणूक काही प्रमाणात सोपी जाईल. त्यामुळे रविवारच्या बैठकीतील निर्णयाकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादीचे सुनील तटकरे या घडामोडीकडे वेगळया नजरेतून पाहत आहेत. प्रशांत ठाकूर उमेदवार नसतील तर या ठिकाणाही राष्ट्रवादी हक्क सांगू शकते. त्याचबरोबर प्रमुख विरोधी पक्ष असलेला शेकापचेही करडी नजर आहे.
ठाकूर हे भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा जोरात असल्याने भाजपाचे स्थानिक नेते रविवारी होणा:या बैठकीकडे डोळे लावून बसले आहेत. तर शिवसेनेचे नेतेही याबाबत उत्सुक असून त्यांनीही राजकीय गणिताची जुळवाजुळव सुरू केली आहे.
च्प्रशांत ठाकूर हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणार नाही हे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र तरीही काँग्रेसच्या बडया नेत्यांकडून त्यांची समजूत काढली जाऊ शकते असा अंदाज आहे. तरीही ठाकूर आपल्या निर्णयावर ठाम राहतील अशी शक्यता आहे.
च्त्यामुळे काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष आर. सी घरत आणि कामगार नेते शाम म्हात्रे यांची नावे चर्चेत असून त्यांनीही फिल्डींगही लावण्यास सुरूवात केली आहे. हे दोनही नेते रविवारी होणा:या काँग्रेसच्या बैठकीला हजर राहतील की नाही याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.