'भारत माता की जय' वरुन राजकारण तापले
By admin | Published: March 16, 2016 05:08 PM2016-03-16T17:08:46+5:302016-03-16T17:12:46+5:30
ओवेसी यांच्या ‘भारत माता की जय’ या घोषणेवरील वक्तव्यावरुन आता राजकारण पेटण्याची शक्यता आहे. आज विधानसभेच कामकाज चालू झाल्यानंतर एमआयएमच्या आमदांरानी माफी मागावी अशी सर्वपक्षीय आमदारंनी मागणी केली.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - लातूर येथील सभेत एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी 'भारत माता की जय बोलणार नाही', असं वक्तव्य केलं होतं त्याचे पडसाद आज विधानसभेत पडले आहेत. ओवेसी यांच्या ‘भारत माता की जय’ या घोषणेवरील वक्तव्यावरुन आता राजकारण पेटण्याची शक्यता आहे.
आज विधानसभेच कामकाज चालू झाल्यानंतर एमआयएमच्या आमदांरानी माफी मागावी अशी सर्वपक्षीय आमदारंनी मागणी केली. त्यांनंतर विधानसभेच कामकाज दान वेळा स्थगित करण्यात आले. अधिवेशन संपेपर्यंत एमआयएम आमदार वारिस पठाण यांचं निलंबन करण्याचा प्रस्ताव विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. तर इम्तियाज जलील यांच्या निलंबनाची मागणी आली आहे.
असदुद्दीन ओवेसी यांच्या 'भारत माता की जय या विधानावर सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपा आणि शिवसेनांनी आक्रमक भुमिका घेतली आहे. एमआयएमच्या दोन्ही आमदारांनी माफी मागावी, व अधिवेशन संपेपर्यंत त्यांना निलंबित केले पाहिजे आशी मागणी एकनाथ खडसे यांनी विधानसभेत केली. तर ‘भारत माता की जय’ जो म्हणणार नाही,तो या सभागृहात राहणार नाही' असा रौप आशिष शेलार यांनी घेतला. तर दुसरीकडे इम्तियाज जलील यांनी भारत माता की जय म्हणणार नाही असे विधानभवनात स्पष्ट केले
ज्येष्ठ गीतकार आणि खासदार जावेद अख्तर यांनी काल राज्यसभेत ओवेसींचा चांगलाच समाचार घेतला. भारत माता की जयह्ण म्हणणं कर्तव्य नव्हे, तो आपला अधिकार आहे, असं म्हणत खासदार आणि ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी असदुद्दीन ओवेसींना खडे बोल सुनावले.