Raj Thackeray: राज्यात राजकारणाचा चिखल झालाय; राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 10:17 AM2023-02-28T10:17:46+5:302023-02-28T10:18:09+5:30

मनसेच्या वतीने आयोजित मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज यांची पनवेल येथील फडके नाट्यगृहात प्रकट मुलाखत झाली. 

Politics has become mud in the state; statement of Raj Thackeray | Raj Thackeray: राज्यात राजकारणाचा चिखल झालाय; राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत

Raj Thackeray: राज्यात राजकारणाचा चिखल झालाय; राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे. कोण नेमका कोणत्या पक्षात आहे, हेच कळत नाही. महाराष्ट्रातील राजकारण एवढ्या खालच्या पातळीवर कधीच गेले नसल्याचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले. मनसेच्या वतीने आयोजित मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज यांची पनवेल येथील फडके नाट्यगृहात प्रकट मुलाखत झाली. 

पत्रकार अमोल परचुरे यांनी राज यांची मुलाखत घेत त्यांना बोलते केले. ‘ठाकरे नेमके काय वाचतात?’ हा मुलाखतीचा विषय होता. ‘मी चेहरे वाचतो’ हे उत्तर देताच नाट्यगृहात चांगलाच हशा पिकला. महाराष्ट्रातील जनतेने महाराष्ट्रासाठी झटलेल्या लोकांचे योगदान समजून घेणे गरजेचे आहे, तसेच दादा कोंडके यांच्यावरचे ‘एकटा जीव’ हे पुस्तक आवडीचे असल्याचे राज  म्हणाले. 

वाचनाचे संस्कार करावे लागत नाहीत, ते होत असतात. यासाठी वाचनही आत्मसात करणे गरजेचे आहे. नियतकालिके बंद पडत आहेत. याकरिता मराठी वाचकांनी वाचन संस्कृती जोपासण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. सध्याच्या घडीला पुतळे केवळ जयंती आणि पुण्यतिथीला धुतले जातात. त्यामुळे केवळ स्मारक उभारून होणार नसल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्रातील राजकारणाबाबत  गुढीपाडव्याला सभेमध्ये बोलणार असे म्हणाले.

आमचं काय जळतं ते तुम्हाला कळेल...
काही दिवसांपूर्वी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह अशा दोन्ही गोष्टी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. त्यानंतर, मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील कधीही मनसे या पक्षावर आणि चिन्हावर दावा सांगू शकतात, असे ‘मिम्स’ व्हायरल झाले होते. यावरही राज ठाकरेंनी रोखठोक मत मांडले. मला आमच्या राजू पाटील यांना विचारायचं आहे की, तुम्ही पक्षाची जबाबदारी घेता का? एकदा हातात घेऊन बघा, मग आमचं काय जळतं, ते कळेल तुम्हाला... आम्ही दिवसरात्र बरनॉल लावत असतो.

Web Title: Politics has become mud in the state; statement of Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.