व्होट जिहादच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं; किरीट सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 02:45 PM2024-11-08T14:45:44+5:302024-11-08T14:46:00+5:30

Maharashtra Election 2024: मराठी मुस्लिम सेवा संघाचे एक पत्र समोर आले असून, त्यात त्यांनी महाविकास आघाडीला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

Politics heated up over the issue of Vote Jihad; Kirit Somaiya's complaint to the Election Commission | व्होट जिहादच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं; किरीट सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार

व्होट जिहादच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं; किरीट सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार

Kirit Somaiya on MVA : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने मुस्लिम संघटनांकडून महाविकास आघाडीच्या समर्थनार्थ सुरू असलेल्या निवडणूक प्रचाराबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. या संपूर्ण प्रकरणात मतांचे ध्रुवीकरण होत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. तसेच, अल्पसंख्याक समाजाला स्वत:कडे आकर्षित करण्यासाठी अनेक प्रकारची आश्वासने दिली जात असल्याचे भाजपचे म्हणने आहे.

अशातच, महाराष्ट्रातील मराठी मुस्लिम सेवा संघाचे एक पत्र समोर आले असून, त्यात त्यांनी महाविकास आघाडीला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. संघटनेचे एक पत्रही समोर आले आहे, ज्यात त्यांनी काही मागण्या केल्या आहेत. यातील अनेक मागण्या वादग्रस्त असल्याचा आरोप भाजपचा आहे. याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून, या संस्थेसह इतर अनेक संस्थांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

"मराठी मुस्लिम सेवा संघ"चे आवाहन
1. ज्यांनी शेकडो निरपराध मुस्लिमांची हत्या केली, त्यांना तुम्ही मत द्याल का?
2. ज्यांनी अलिगड मुस्लिमांकडून हिसकावून घेतला, त्यांना तुम्ही मत द्याल का?
3. मुस्लिमांवर समान नागरी कायदा लागू करणाऱ्यांना तुम्ही मतदान कराल का?
4. मदरसे रद्द करण्याचा विचार करणाऱ्यांना तुम्ही मतदान कराल का?
5. वक्फच्या विरोधात असलेल्यांना तुम्ही मत द्याल का?
6. ज्यांनी आमच्यावर CAA, NRC लादले, त्यांना तुम्ही मत द्याल का?
7. जे आमच्या मुलींच्या डोक्यावरून हिजाब काढतात, त्यांना तुम्ही मत द्याल का?
8. मशिदीत घुसलेल्या व्यक्तीच्या पाठीशी उभ्या असलेल्या पक्षांना तुम्ही मत द्याल का?
9. जे आमच्या मुस्लिमांच्या वस्त्या बुलडोझरने उद्ध्वस्त करतात, त्यांना तुम्ही मत द्याल का?
10. आपले बहुमोल मत देऊन महाविकास आघाडीला यशस्वी करा.

किरीट सोमय्यांची सोशल मीडियावर माहिती 
किरीट सोमय्या यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यांनी लिहिले, "मी धार्मिक भावना भडकावण्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. मराठी मुस्लिम सेवा संघ आणि अशा 400 स्वयंसेवी संस्था मुस्लिमांना व्होट जिहादसाठी भडकवत आहेत. धार्मिक भावनांचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केला जात आहे, परिणामी दंगली होऊ शकतात. ."

मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार 
दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, "मी मराठी मुस्लिम सेवा संघ आणि इतर अशा एनजीओच्या विरोधात मुस्लिमांना भडकावल्याबद्दल आणि धार्मिक मोहिमा चालवल्याबद्दल मुलुंड पूर्व पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. माझी तक्रार निवडणूक आयोग आणि मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांकडेही पाठवण्यात आली आहे."

Web Title: Politics heated up over the issue of Vote Jihad; Kirit Somaiya's complaint to the Election Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.