राजकारण माझा धंदा नाही, भाजपासह सगळ्याच पक्षांवर नाराज; गिरीश बापटांंचं परखड मत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2022 01:56 PM2022-09-03T13:56:35+5:302022-09-03T13:57:20+5:30

मी ५० वर्ष मी राजकारणात आहे. एक त्रिकोण, चौक दाखवा जिथे मी माझ्या आईबापाचं नाव दिले. ही कुठली प्रथा आहे. आपल्या बापाची प्रॉपर्टी आहे का? सातबारा आपल्या नावावर आहे का? असा संतप्त सवाल बापटांनी केला.

Politics is not my business, angry with all parties including BJP; Girish Bapat's strong opinion on todays politics | राजकारण माझा धंदा नाही, भाजपासह सगळ्याच पक्षांवर नाराज; गिरीश बापटांंचं परखड मत

राजकारण माझा धंदा नाही, भाजपासह सगळ्याच पक्षांवर नाराज; गिरीश बापटांंचं परखड मत

googlenewsNext

पुणे - राजकीय जीवनात आपण सामाजिक, शैक्षणिक काम करतो. पायाभूत समाजाच्या शेवटपर्यंत जाणे आणि प्रश्न सोडवणे हे आपलं काम आहे. परंतु आता कार्यकर्त्यामधील कार्य मेले अन् फक्त पुढारीच राहिला हे बरोबर वाटत नाही. ४०-४५ वर्ष आम्ही सतत काम करत राहिलो. आपली बांधिलकी समाजाशी आहे. समाज नोंद घेत असतो. मतांच्या राजकारणासाठी काहीही करत राहिलो तर ते चुकीचं आहे असं परखड मत पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी मांडले आहे. 

गिरीश बापट म्हणाले की, कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांच्या भूमिकेत राहावं. पक्ष त्याची दखल घेत असतो. लोकप्रतिनिधी होण्याची संधी सगळ्यांनाच मिळते असं नाही. जागा मर्यादित आहेत. आरक्षण आहेत. खरा निर्मळ आनंद लोकांचं काम करण्यात असतो. एखाद्याचं काम आपण केले तर त्याच्या चेहऱ्यावर हास्य येते याचा आनंद वाटतो. परंतु नव्या राजकीय संस्कृतीत काम सोडून बाकी सगळे सुरू आहे. हे आमच्यासारख्या जुन्या पिढीतील लोकांना पटत नाही. मग तो कुठल्याही पक्षाचा, भाजपाचाही असला तरी ते योग्य नाही असं त्यांनी म्हटलं. 

तसेच मी ५० वर्ष मी राजकारणात आहे. एक त्रिकोण, चौक दाखवा जिथे मी माझ्या आईबापाचं नाव दिले. ही कुठली प्रथा आहे. आपल्या बापाची प्रॉपर्टी आहे का? सातबारा आपल्या नावावर आहे का? लोकांनी काम करण्यासाठी निवडून दिलेय. लोकांसमोर आदर्श जात नाही. निर्मळ मनाने काम करायला हवं. अधिकाऱ्यांवर वचक निर्माण करण्याचं काम मी केले. आजकाल उद्धाटन, भूमिपूजन करतात, फोटो सोशल मीडियात टाकले जातात हे खरे काम नाही असं गिरीश बापटांनी सांगितले. 

सध्याच्या राजकारणाला व्यावसायिक स्वरुप 
आमचं भांडणं वैचारिक असले पाहिजे व्यक्तिगत नाही. एखाद्याचे विचार पटले नाही तर लोकशाहीपद्धतीने त्याला सांगितले पाहिजे. सध्याच्या राजकारणाला व्यावसायिक स्वरुप आले आहे. मी ३५ वर्ष नोकरी केली. नगरसेवक, आमदार असतानाही निवृत्त होईपर्यंत नोकरी केली. राजकारण हा माझा धंदा नाही. हे माझं व्रत आहे. आम्ही उद्दिष्टे ठेवून काम करतात. अडचणीत असलेल्या माणसांकडून काय अपेक्षा करणार. सगळं मतांच्या राजकारणासाठी केले जातय यात आनंद नाही असं बापटांनी म्हटलं. 

सहन करण्याची हिंमत ताकद हवी
ज्यादिवशी मी मंत्री झालो तेव्हा एकदिवस माझ्या नावापुढे माजी मंत्री, माजी खासदार, माजी आमदार लागणार आहे. सध्या त्या परिस्थितीत कोण यायला तयार नाही असं कसं चालेल. हे चुकीचे आहे. सर्वपक्षांवर मी नाराज आहे. हे मनाला पटणारं नाही. माझ्या आत्म्याला ते सहन होत नाही. सातत्याने काम करणं हा गुण आहे. राजकीय जीवनात चढ-उतार अनेक असतात. सहन करण्याची हिंमत ताकद हवी असा सल्ला गिरीश बापटांनी सध्याच्या राजकीय नेत्यांना दिला. 

समाज कसा चालणार? 
शरद पवारांच्या आणि माझ्या पक्षाचे वैचारिक मतभेद नक्की आहेत. अनेक निवडणुकीत मी त्यांच्यावर टीका केलीय. परंतु मी वैयक्तिक पवारांवर किंवा अन्य कुणावरही टीका केली नाही. राजकारणाची पातळी एवढी खालावली की भविष्य काळात कोण राजकारणात येऊन काय करेल, सगळ्या समाजाचं नेतृत्व त्याच्याकडे असते. निर्णय प्रक्रियेत त्याचा सहभाग असतो. ते जर डोक्यात नसेल तर समाज कसा चालणार असा सवालही गिरीश बापटांनी उपस्थित केला. 

Web Title: Politics is not my business, angry with all parties including BJP; Girish Bapat's strong opinion on todays politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.