क्रांती दिनाचेही राजकारण
By Admin | Published: August 10, 2016 04:29 AM2016-08-10T04:29:14+5:302016-08-10T04:29:14+5:30
ऐतिहासिक ‘चले जाव’ चळवळीची आठवण करून देणाऱ्या आॅगस्ट क्रांती दिनावरून भाजपा आणि काँग्रेसमध्ये मंगळवारी राजकारण रंगले
मुंबई : ऐतिहासिक ‘चले जाव’ चळवळीची आठवण करून देणाऱ्या आॅगस्ट क्रांती दिनावरून भाजपा आणि काँग्रेसमध्ये मंगळवारी राजकारण रंगले. भाजपा कार्यकर्त्यांनी सकाळी नाना चौक ते आॅगस्ट क्रांती मैदान रॅली काढली. त्यावर ७४ वर्षांनी भाजपाला अचानक का जाग आली, असा सवाल काँग्रेसने केला. आॅगस्ट क्रांती मैदानावर काँग्रेस आणि भाजपाचा कार्यक्रम झाला.
‘चले जाव चळवळी’च्या अमृत महोत्सवी वर्षाच्या आरंभानिमित्त मुंबई भाजपातर्फे रॅली काढण्यात आली, असे मुंबई भाजपाध्यक्ष आशीष शेलार यांनी सांगितले. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, आ. राज पुरोहित, योगेश सागर, अमित साटम,
प्रदेश संघटन मंत्री रवींद्र भुसारी यांच्यासह मुंबई भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते.
त्यावर ‘चले जाव चळवळी’त भाजपाची मातृसंस्था असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सहभाग घेतला नव्हता. उलट विरोधच केला होता. त्यानंतर भाजपानेही कधी आॅगस्ट क्रांती दिनाच्या कार्यक्रमात सहभाग नोंदविला नव्हता. आता अचानक ७४ वर्षांनी भाजपाला का जाग आली, असा सवाल करत या ऐतिहासिक आंदोलनाचे महत्त्व कमी करण्यासाठी भाजपा राजकारण करीत असल्याचा आरोप काँग्रेसने केला.
अवमानाची तक्रार
आॅगस्ट क्रांती मैदानावर यंदा भाजपाचा सरकारी कार्यक्रम आणि काँग्रेसचा कार्यक्रम, असे दोन कार्यक्रम झाले. मैदानातच त्यासाठी दोन व्यासपीठे उभारण्यात आली होती. काँग्रेसच्या कार्यक्रमानंतर राष्ट्रगीत सुरूअसताना भाजपाच्या मंडपातील काही कार्यकर्ते उभे होते. तर काही जण बसून होते. त्यामुळे राष्ट्रगीताचा अपमान झाला असून पोलिसांनी त्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आल्याचे काँग्रेस नेते चरणसिंग सप्रा यांनी सांगितले.
‘चले जाव-२’ म्हणायला
हा सिनेमा आहे का - सावंत
‘चले जाव चळवळ-२’ अशी बॅनरबाजी करणाऱ्या भाजपाला ही चळवळ म्हणजे बॉलिवूड सिनेमाचा सिक्वेल वाटला का, असा सवाल काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. गेल्या वर्षी मुख्यमंत्र्यांनी आॅगस्ट क्रांती मैदानाला भेट ही दिली नव्हती. आता का जाग आली, असे ते म्हणाले.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्मारकावर फुले वाहून स्वातंत्रसैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली. ‘चले जाव-२’ चा नारा देत क्रांती मैदानावर कार्यक्रम घेण्यात आला. यंदा भाजपाने सत्तेच्या जोरावर विनापरवाना स्वत:चे व्यासपीठ उभारल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष निरुपम यांनी केला.
‘चले जाव चळवळी’त भाजपाची मातृसंस्था असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सहभाग घेतला नव्हता. उलट विरोधच केला होता. त्यानंतर भाजपानेही कधी आॅगस्ट क्रांती दिनाच्या कार्यक्रमात सहभाग नोंदविला नव्हता. आता अचानक ७४ वर्षांनी भाजपाला का जाग आली, असा सवाल काँग्रेसने केला.
आॅगस्ट क्रांती दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे मंगळवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी क्रांती मैदानावरील स्मारकावर फुले वाहून स्वातंत्रसैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली. यंदा प्रथमच भाजपाने क्रांती दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ‘चले जाव-२’ चा नारा देत क्रांती मैदानावर मोठा कार्यक्रम घेण्यात आला.
दरवर्षी काँग्रेसकडून या दिवसानिमित्त कार्यक्रम केला जातो. यंदा मात्र भाजपाने सत्तेच्या जोरावर विनापरवाना व्यासपीठ उभारल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला. केवळ या दिवसाचे महत्त्व कमी करण्यासाठी राजकारण केले जात असल्याची टीका निरुपम यांनी केली.