शेतकरी संपात फूट पाडण्याचे राजकारण!

By admin | Published: May 18, 2017 12:37 AM2017-05-18T00:37:24+5:302017-05-18T00:37:24+5:30

राज्यातील शेतकऱ्यांनी एक जूनपासून संपावर जाण्याची घोषणा केली आहे, ते पाहता मुख्यमंत्र्यांनी धुळे येथे जाण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष द्यायला हवे होते, असे सांगत

Politics of the split of farmers! | शेतकरी संपात फूट पाडण्याचे राजकारण!

शेतकरी संपात फूट पाडण्याचे राजकारण!

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : राज्यातील शेतकऱ्यांनी एक जूनपासून संपावर जाण्याची घोषणा केली आहे, ते पाहता मुख्यमंत्र्यांनी धुळे येथे जाण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष द्यायला हवे होते, असे सांगत देशात पहिल्यांदाच शेतकरी संपावर जात असताना मुख्यमंत्री संपात फूट पाडण्याचे राजकारण करीत असल्याचा हल्लाबोल उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी येथे केला.
शुक्रवारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नाशिकला शेतकरी अधिवेशन होणार असून त्यात संपावर जाणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधीदेखील सहभागी होणार असल्याची माहिती देसाई यांनी दिली. नापिकी व कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ होत असून शेतकरी कर्जमुक्त व्हावा, हीच शिवसेनेची मागणी आहे. सत्तेत असलो तरी शिवसेना सध्या मागणाऱ्याच्या भूमिकेत असल्याने शेतकऱ्यांना देणाऱ्याच्या भूमिकेत फक्त मुख्यमंत्री व वित्तमंत्री असल्याची टीका त्यांनी केली. बुधवारी सुभाष देसाई व खा. संजय राऊत यांनी शुक्रवारच्या अधिवेशनाचा आढावा घेतला.
शिवसेनेने मराठवाडा, विदर्भ, अकोला यांसारख्या भागांमध्ये केलेल्या पाहणीत व घेतलेल्या भेटीत शेतकऱ्यांच्या अनेक समस्या समोर आल्या आहेत. शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळालेले नाहीत, तर शासनाच्या योजनादेखील त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नसल्याचे आढळून आले. शेतकऱ्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शिवसेनेने दक्षता पथक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. ‘मी कर्जमुक्त होणारच, गर्जतो शेतकरी’ असा नारा घेऊन शिवसेना रस्त्यावर उतरली आहे, असे ते म्हणाले.

पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांचा लाँगमार्च
सत्तेत असलो तरी आमच्याकडे शेतकऱ्यांना देण्यासारखे काहीच नाही म्हणून ते मिळविण्यासाठीच शिवसेना लढ्यात उतरली आहे. शेतकरी कर्जमुक्ती झाली नाही तर पावसाळी अधिवेशनावर शेतकऱ्यांचा भव्य लॉँगमार्च काढण्यात येईल व ‘आर-पार’ची लढाई लढण्यात येईल, अशी घोषणाही देसाई व राऊत यांनी केली.

Web Title: Politics of the split of farmers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.