‘राजकारणात या, पण आधी पोस्टर चिकटवा!’

By admin | Published: October 17, 2016 03:57 AM2016-10-17T03:57:57+5:302016-10-17T03:57:57+5:30

राजकारणात यायचे असेल तर खुशाल या, पण आधी सामान्य कार्यकर्ता म्हणून प्रचाराचे पोस्टर चिकटवण्याची तयारी ठेवा, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नेत्यांना सल्ला दिला.

'In politics, but stick to the poster!' | ‘राजकारणात या, पण आधी पोस्टर चिकटवा!’

‘राजकारणात या, पण आधी पोस्टर चिकटवा!’

Next


नागपूर : आज राजकारणात सर्वत्र घराणेशाही जोपासली जातेय, परंतु मी माझ्या मुलांना सांगितले आहे, तुम्हाला राजकारणात यायचे असेल तर खुशाल या, पण आधी सामान्य कार्यकर्ता म्हणून प्रचाराचे पोस्टर चिकटवण्याची तयारी ठेवा, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नेत्यांना सल्ला दिला.
सप्तक व छाया दीक्षित वेल्फेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गडकरी यांनी पत्नी कांचन यांच्यासह त्यांच्या समंजस व विश्वासू सहजीवनाचे विविध पैलू उलगडले.
या वेळी गडकरी म्हणाले, ‘मी पक्षाला सांगितले आहे, आता यापुढे कधीही पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष होणार नाही. मला खासदारकी, मंत्रिपदच काय, तर राजकारणही सोडावे लागले तर सोडून देईल. हे पद मला मिळू नये, म्हणून जे राजकारण खेळले गेले, त्याने मला फार वेदना दिली,’ अशी खंतही गडकरी यांनी पहिल्यांंदा जाहीररीत्या व्यक्त केली. (प्रतिनिधी)
कांचननेच सावरला संसार
मी अगदी कमी वयातच समाजकारण, राजकारणाचे व्रत स्वीकारले होते. पाय कधीच जागेवर नसायचा. कांचनला याची पूर्ण जाणीव होती. एमएसस्सी फर्स्ट क्लास झालेली ही मुलगी. लग्नानंतर काय वाट्याला येईल, हे तिला स्पष्ट दिसत होते. तरीही तिने मला साथ देण्याचा निर्णय घेतला. पुढे आमदार, मंत्री झाल्यावर आयुष्य आणखी व्यस्त होत गेले. पहिला मुलगा झाला तेव्हा सर्व त्याला पाहून गेले. मी प्रचारात होतो. रात्री १० नंतर सर्वाच्या शेवटी मी निखिलला कुशीत घेतले. पण, कांचनने कधी कुठल्या गोष्टीची तक्रार केली नाही. २५ कप चहा बनवून ती किचन बाहेर येते न येते तोच मी पुन्हा तिला ५० कप चहाची आॅर्डर सोडायचो. तिने कधी नाक मुरडल्याचे मला आठवत नाही. कांचन सोबत होती म्हणूनच मी निश्चिंत होऊन हा राजकीय प्रवास करू शकलो, अशा शब्दात गडकरींनी पत्नी कांचन यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
राजकारणात सर्वच अतृप्त आत्मे
मी मागे अच्छे दिन कधीच येत नाही, असे बोललो तर नॅशनल मीडियाने मला टार्गेट केले़ पण, हे खरे आहे़ माणसांच्या अपेक्षा कधीच संपत नाहीत़ राजकारणात तर ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते़ येथे सर्वच अतृप्त आत्मे आहेत़ जो नगरसेवक आहे त्याला आमदारकीचे तिकीट हवे असते. आमदाराला मंत्रिपदाचे स्वप्न पडते व मंत्री बनला त्याला थेट मुख्यमंत्रीच व्हायचे असते, याकडेही गडकरींनी मिश्कील हास्य ओठांवर आणीत श्रोत्यांचे लक्ष वेधले़

Web Title: 'In politics, but stick to the poster!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.