‘भिकाऱ्यांपेक्षा राजकारण्यांची अवस्था वाईट’

By admin | Published: November 15, 2016 05:59 AM2016-11-15T05:59:04+5:302016-11-15T05:59:04+5:30

राजकारण्यांना मतांचे गणित टिकवून ठेवण्यासाठी नेहमीच कसरत करावी लागत असते. कारण हा धंदाच मोठा जिकिरीचा झाला असून,

'Politics is worse than beggars' | ‘भिकाऱ्यांपेक्षा राजकारण्यांची अवस्था वाईट’

‘भिकाऱ्यांपेक्षा राजकारण्यांची अवस्था वाईट’

Next

जळगाव : राजकारण्यांना मतांचे गणित टिकवून ठेवण्यासाठी नेहमीच कसरत करावी लागत असते. कारण हा धंदाच मोठा जिकिरीचा झाला असून, राजकारण्यांची अवस्था भिकाऱ्यांपेक्षाही वाईट आहे, अशी खंत सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे व्यक्त केली.
जिल्हा माळी महासंघातर्फे आयोजित वधू-वर परिचय मेळाव्यात ते म्हणाले, निम्म्या राजकारण्यांना ‘शुगर’चा त्रास आहे. राजकारण्यांच्या ताण-तणावाबद्दलही पाटील यांनी चिंता व्यक्त केली. राज्यात लोकसंख्येच्या आधारे ओबीसी समाज दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे ओबीसी समाजातील ५०० विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षण घेण्यासाठी स्वतंत्र कोटा तयार करण्यात यावा, अशी मागणी सरकारकडे करणार असल्याचेही गुलाबराव पाटील म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: 'Politics is worse than beggars'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.