पाच जागांसाठी मतदान

By admin | Published: February 4, 2017 01:32 AM2017-02-04T01:32:16+5:302017-02-04T01:32:16+5:30

विधान परिषदेच्या पाच जागांसाठी शुक्रवारी किरकोळ गैरप्रकार वगळता शांतेतत मतदान झाले. नागपूर, कोकण, मराठवाडा शिक्षक मतदार संघ व नाशिक, अमरावती

Poll for five seats | पाच जागांसाठी मतदान

पाच जागांसाठी मतदान

Next

मुंबई : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी शुक्रवारी किरकोळ गैरप्रकार वगळता शांतेतत मतदान झाले. नागपूर, कोकण, मराठवाडा शिक्षक मतदार संघ व नाशिक, अमरावती पदवीधर मतदार संघासाठी सोमवारी मतमोजणी होणार आहे.
नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघासाठी विभागात किरकोळ बाचाबाचीचे प्रकार वगळता सरासरी ५४ टक्के इतके मतदान झाले. अमरावती पदवीधरसाठी ६३.४६ टक्के तर नागपूर शिक्षक संघात ८३ टक्के मतदान झाले. नाशिकमध्ये मतदान केंद्राबाहेर उमेदवारांनी लावलेल्या बुथमुळे आचारसंहिता भंग होत असल्याच्या तक्रारी प्रतिस्पर्धी उमेदवारांनी केल्यामुळे काहीकाळ राजकीय तणावही निर्माण झाला. केटीएचएम महाविद्यालयाबाहेर लावलेल्या कक्षावरून डॉ. सुधीर तांबे, डॉ. प्रशांत पाटील व प्रकाश देसले यांनी एकमेकांच्या विरोधात तक्रार केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)

‘कोकण शिक्षक’साठी ८४.९८ टक्के
ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील ३७ हजार ६०४ मतदारांपैकी ८४.९८ टक्के शिक्षकांनी कोकण शिक्षक मतदार संघासाठी मतदान केले. शिक्षक परिषदेचे वेणुनाथ कडू , शिक्षक भारतीचे अशोक बेलसरे आणि विद्यमान आमदार व शिक्षक परिषदेचे बंडखोर अपक्ष उमेदवार रामनाथ मोते यांच्यात तिरंगी लढत होत आहे.

मराठवाडा शिक्षक : ८७.२६ टक्के मतदान
मराठवाडा शिक्षक मतदारसंघात सरासरी ८७.२६ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान हिंगोली तर सर्वाधिक कमी औरंगाबाद जिल्ह्यात झाले. जालना, परभणी, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूरमध्येही मतदान झाले.

Web Title: Poll for five seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.