पोळची कोल्हापूर जेलमध्ये रवानगी होणार

By Admin | Published: August 28, 2016 01:42 AM2016-08-28T01:42:12+5:302016-08-28T01:42:12+5:30

सीरियल किलर संतोष पोळ याच्या सुरक्षिततेला जिल्हा कारागृहात धोका होण्याची शक्यता असल्याने त्याची रवानगी कोल्हापूर (कळंबा) येथील ‘हाय सिक्युरिटी जेल’मध्ये करण्यात

Pollach will be sent to Kolhapur jail | पोळची कोल्हापूर जेलमध्ये रवानगी होणार

पोळची कोल्हापूर जेलमध्ये रवानगी होणार

googlenewsNext

सातारा : सीरियल किलर संतोष पोळ याच्या सुरक्षिततेला जिल्हा कारागृहात धोका होण्याची शक्यता असल्याने त्याची रवानगी कोल्हापूर (कळंबा) येथील ‘हाय सिक्युरिटी जेल’मध्ये करण्यात येणार आहे. या ठिकाणी त्याला स्वतंत्र बराकीत ठेवण्यात येणार असून, तो तीन गार्ड आणि चोवीस तास सीसीटीव्हीच्या देखरेखीत असणार आहे.
पोळने केलेल्या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. समाजामधून त्याच्यावर संताप आणि रोष प्रचंड वाढलेला आहे. अनेकांनी त्याला फासावर लटकवण्याची मागणी केली आहे तर काहींनी त्याला न्यायालयात नेताना चपलांचा हार घालू, असा इशारा दिल्याने त्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न महत्त्वाचा आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील बंदिवानांमध्ये त्याच्या कृत्यांबाबत तीव्र संताप आहे. त्यामुळे कारागृह अधीक्षक एन. एन. चोंधे यांनी खबरदारी म्हणून त्याला ‘हाय सिक्युरिटी जेल’मध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पोळची साथीदार ज्योती मांढरे हिलाही कळंबा जेलमध्येच ठेवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

सहा दिवस पोलीस कोठडी : संतोष पोळ याला सलमा शेख खूनप्रकरणी न्यायालयाने दि. १ सप्टेंबरपर्यंत सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. शनिवारी दुपारी १२च्या सुमारास त्याला पोलीस बंदोबस्तात वाई न्यायालयात हजर करण्यात आले.

- पोळविरुद्ध सध्या समाजात प्रचंड संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे त्याला सुरक्षेच्या कारणास्तव कोल्हापूरला हलविले जाणार आहे.

Web Title: Pollach will be sent to Kolhapur jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.