पोलार्ड, स्टार्क दंडावर बचावले
By admin | Published: May 8, 2014 12:56 AM2014-05-08T00:56:40+5:302014-05-08T00:56:40+5:30
सामनाधिकारी अॅण्डी पायक्रॉफ्ट यांनी नरमाईचे धोरण अवलंबून दोन्ही खेळाडूंची कवेळ दंडात्मक कारवाईवर सुटका केली आहे.
सामनाधिकारी पायक्रॉफ्ट यांची नरमाईची भूमिका...
विनय नायडू - मुंबई मुंबई इंडियन्सचा विंडीजचा खेळाडू किरोन पोलार्ड आणि आॅस्ट्रेलियाचा जलद गोलंदाज रॉयल चॅलेंजर्स बेंगळरुचा मिशेल स्टार्क यांच्यात मंगळवारी वानखेडे मैदानावर जी शाब्दिक चकमक झाली त्यावर सामनाधिकारी अॅण्डी पायक्रॉफ्ट यांनी नरमाईचे धोरण अवलंबून दोन्ही खेळाडूंची कवेळ दंडात्मक कारवाईवर सुटका केली आहे. स्टार्ककडे बॅट भिरकावल्याबद्दल पोलार्डला मॅचफिसच्या ७५ ट्क्के रकमेचा दंड तर स्टार्कला खेळ भावनेची पायमल्ली केल्याबद्दल मॅचफिसच्या ५० टक्के रकमेचा दंड ठोठावण्यात आला. मुंबईच्या डावातील १७ व्या षटकांत ही घटना घडली होती. पोलार्ड फलंदाजीसाठी सज्ज नसताना स्टार्कने चेंडू टाकल्यामुळे पोलार्ड भडकला होता. नाराज पोलार्डने स्टार्ककडे कूच केली आणि आपली बॅट त्याच्या दिशेने वळवली पण ही बॅट त्याच्या हातून निसटल्याने जमीनीवर आदळली होती. निराश आणिरागाने लालबुंद झालेल्या पोलार्डने ही बाब लगेचच पंचाच्या कानावर घातली. याआधीचा चेंडू देखील स्टार्कने बाऊन्सर टाकला होता. हा चेंडू पोलार्डच्या कानात घोंठावून त्याच्या डोक्यावरुन निघून गेला. स्टार्कने यावर पोलार्डच्या दिशेने इशारा करीत काही शब्द पुटपुटले होते. पोलार्डने यावर स्टार्कला इशारा करीत मागे जाण्यास सांगितले. नंतर दोन्ही खेळाडूंना पाचारण करीत मैदानी पंचांनी दोघांचीही समजूत काढली. आरसीबीकडून खेळणारा ख्रिस गेल याने आपला सहकारी पोलार्डची समजूत काढली. पंचांनी कुर्मगती गोलंदाजीबद्दल दोन्ही संघांचे कर्णधार विराट कोहलीं आणि रोहित शर्मा यांच्यावर दंड अकारला. रोहितने दुसर्यांदा मंदगती गोलंदाजी केल्यामुळे त्याच्यावर २४ लाखाचा तर विराटवर १२ लाखाचा दंड ठोठावण्यात आला. याशिवाय मुंबई इंडियन्सच्या प्रत्येक खेळाडूकडून सहा लाख किंवा सामना शुल्काच्या २५ टक्के रकमेची वसुली करण्यात येणार आहे. आरसीबीचा जलद गोलंदाज वरुन अॅरोन याला कपड्यांशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल समज देण्यात आली. या संदर्भात आरसीबीचे मार्गदर्शक व्हिटोरी म्हणाले, मला मिचेलबरोबर किंवा या प्रकरणात असलेल्यांशी बोलण्याची संधी मिळाली नाही. अर्थातच असे काही आपल्याला क्रिकेटच्या मैदानावर पाहण्याची इच्छा नाही. पाहू आता मॅच रेफ्री काय निर्णय घेतात. क्रिकेट हा जंटलमेन्स गेम आहे. पण खेळाडूंनी मैदानावर असे वागणे योग्य नाही. बांगलादेश येथे झालेल्या टी-२० विश्वचषकाच्या वेळी वेस्ट इंडिज संघाने आॅस्ट्रेलियाविरुध्द विजय साजरा करताना गेल अॅन्ड कंपनीने गंगनम नृत्य सादर केले तेव्हा त्याच्या चेहर्यावर रागीट भाव होते. तेव्हा आॅस्ट्रेलियाचा अष्टपैलू जेम्स फॉल्करने प्रतिक्रीया दिली होती की, वेस्ट इंडियन्स त्याला आवडत नाहीत. क्रिकेटमधील हा पहिला प्रसंग नाही. हे प्रकार थांबतील असे सुध्दा नाही. हे होतच राहणार. दोन संघ एकमेकांना पराभूत करण्याच्या ईर्षेने खेळत असतात.