पुणे जिल्ह्यात दुपारपर्यंत ३९.६८ टक्के मतदान

By admin | Published: February 21, 2017 05:04 PM2017-02-21T17:04:52+5:302017-02-21T17:04:52+5:30

जिल्हा परिषदेच्या ७५ गटासाठी व १५0 गणासाठी मंगळवार सकाळी साडेसात पासून मतदानाला सुरूवात होवून दुपारी दिड वाजेपर्र्यत ३९.६८ टक्के शांततेत मतदान झाले.

Polling in the district of Pune district was 39.68 percent | पुणे जिल्ह्यात दुपारपर्यंत ३९.६८ टक्के मतदान

पुणे जिल्ह्यात दुपारपर्यंत ३९.६८ टक्के मतदान

Next

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 21 : जिल्हा परिषदेच्या ७५ गटासाठी व १५0 गणासाठी मंगळवार सकाळी साडेसात पासून मतदानाला सुरूवात होवून दुपारी दिड वाजेपर्र्यत ३९.६८ टक्के शांततेत मतदान झाले. मतदार स्लीपा दुर्गम व ग्रामीण भागात न पोहल्याने मतदारांचा थोडासा गोंधळ उडाला. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत मतदान होणार आहे. सकाळी साडेआकरा वाजेपर्यंत २५.८९ टक्के मतदान झाले होते. दुपारी दिड वाजेपर्र्यत ही टक्केवारी १३.७९ टक्क्यांनी वाढून ३९.६८ टक्के झाली. जिल्ह्यात एकूण २७ लाख ९२ हजार ७७३ मदातर असून, यामध्ये १४ लाख ७0 हजार ५0 पुरुष तर १३ लाख २ हजार १८३ महिला मतदार आहेत. यात अन्य १२ मतदार आहेत. यापैैकी दुपारी दिड वाजेपर्र्यत ७ लाख ५३ हजार ५६७ पुरूषांनी तर ३ लाख ५४ हजार ५१७ महिला अशा ११ लाख ८ हजार८४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

जिल्हा परिषदच्या ७५ गटासाठी ३७५ तर पंचायत समितीसाठी ६४३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यावेळी प्रथमच जिल्ह्यात राष्ट्रवादी काँगे्रस, काँगे्रस, शिवसेनेसह भारतीय जनता पार्टी स्वबळावर निवडणूक लढवत आहेत. २ जिल्हा परिषद गट व ९ पंचायत समिती गणात थेट लढती होत असून उर्वरीत सर्व ठिकाणी बहुरंगी लढीत होत आहोत. निवडणुकीसाठी तब्बल २२ हजार २५५ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक केंद्रासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी स्वतंत्र अशा दोन स्वतंत्र ईव्हीएम मशीन देण्यात आल्या होत्या. जिल्ह्यात ३ हजार ३६९ केंद्रांसाठी १० हजार २०० बॅलेट युनिट व ७ हजार ४८० कंट्रोल युनिटचे वाटप केले आहे.

जिल्ह्यात ८४ मतदान केंद्रे संवेदनशील असून त्या केंद्रावर केंद्रावर अधिकचा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
२७ लाख ९२ हजरा मतदार स्लीपा वाटपाचे आवाहन जिल्हा प्रशासनावर होते. मात्र मतदान सुरू झाले तरी दुर्गम व डोंगरी भागात या स्लीपा पोहचल्याच नव्हत्या. मतदान यादीच नावे चुकीची होती. तर जन्या मतदार याद्या पाहून कागदावरच मतदान क्रमांक लिहून दिला जात असल्याने मतदान करताना गोंधळ उडत होता. या निडणुकीत नवमदरांनी आपला मतदानाचा हक्क बाजवला. या मदारांचे काही ठिकाणी गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले.

पुणे जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी मतदान
११.३0 पर्यंत
टक्के : २५.८९
पुरूष : ४ लाख ५५ हजार ६२३
महिला : २ लाख ६७ हजार ३७३
एकूण : ७ लाख २२ हजार ९९६

१: ३0 पर्र्यत
टक्के : ३९.६८
पुरूष : ७ लाख ५३ हजार ५६७
महिला : ३ लाख ५४ हजार ५१७
एकूण : ११ लाख ८ हजार ८४

Web Title: Polling in the district of Pune district was 39.68 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.