अकरा नगर परिषदांसाठी १५ जुलै रोजी मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 06:15 AM2018-06-16T06:15:00+5:302018-06-16T06:15:00+5:30
राज्यातील ११ नगर परिषदा/ नगर पंचायतींसाठी १५ जुलै रोजी मतदान होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी येथे दिली.
मुंबई - राज्यातील ११ नगर परिषदा/ नगर पंचायतींसाठी १५ जुलै रोजी मतदान होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी येथे दिली.
पोटनिवडणूक होत असलेल्या जागांचा नगर परिषद/ नगर पंचायतनिहाय तपशील असा- जव्हार (जि. पालघर)- ६ ब,
पोलादपूर (जि. रायगड)- १६,
राजापूर (जि. रत्नागिरी)- अध्यक्ष, पंढरपूर (जि. सोलापूर)-१०ब,
वाई (जि. सातारा)-५अ, मेढा
(जि. सातारा)- १५, निफाड (जि. नाशिक)- ६, श्रीरामपूर (जि. अहमदनगर)- १२अ, नंदुरबार (जि. नंदुरबार)- १६अ, लोहारा बु. (जि. उस्मानाबाद)- २, मोहाडी (जि. भंडारा)- १२ आणि शेगाव (जि. बुलडाणा)- हद्दवाढ क्षेत्र.
या नगर परिषदा आणि नगर पंचायतींबरोबरच पोटनिवडणूक होत असलेल्या संबंधित ठिकाणी शुक्रवारपासून आचारसंहिता लागू झाली आहे.
निवडणूक कार्यक्रमाचा तपशील
नामनिर्देशनपत्रे सादर करणे - १९ ते२५ जून २०१८
नामनिर्देशनपत्रांची छाननी - २६ जून २०१८
अपील नसल्यास उमेदवारी मागे घेणे - ०२ जुलै २०१८
अपील असल्यास उमेदवारी मागे घेणे - निकालाच्या तिसऱ्या दिवसापर्यंत
मतदानाचा दिनांक - १५ जुलै २०१८
मतमोजणीचा दिनांक - १६ जुलै २०१८