राज्यतील 16 जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी आज मतदान, सरपंचपदासाठी पहिल्यांदाच होतेय थेट निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 07:42 AM2017-10-07T07:42:02+5:302017-10-07T07:44:41+5:30

राज्यभरातील 16 जिल्ह्यात आज ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 3 हजार 884  ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरु झालं आहे.

Polling for the Gram Panchayats today, for the first time in the 16 districts all over the state, the direct election for the post of Sarpanch | राज्यतील 16 जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी आज मतदान, सरपंचपदासाठी पहिल्यांदाच होतेय थेट निवडणूक

राज्यतील 16 जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी आज मतदान, सरपंचपदासाठी पहिल्यांदाच होतेय थेट निवडणूक

Next

मुंबई : राज्यभरातील 16 जिल्ह्यात आज ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 3 हजार 884  ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरु झालं आहे. नगरपालिकांप्रमाणेच पहिल्यांदाच सरपंचपदासाठी थेट निवडणूक होणार आहे. बहुतांश ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी बहुरंगी लढती होणार असल्याचे स्पष्ट झाले. काही ग्रामपंचायत या बिनविरोध झाल्या आहेत. स्थानिक संस्थांच्या निवडणुकीमध्ये झालेल्या सत्ता हस्तांतरणानंतर होऊ घातलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत व विशेषत: जनतेतून थेट सरपंच निवडण्यात येणार असल्यामुळे अधिक चुरस निर्माण झाल्याचे दाखल उमेदवारी अर्जातून स्पष्ट झालं. 
दुसऱ्या टप्प्यातील मतदान 14 तारखेला होईल. तर मतमोजणी 16 तारखेला होणार आहे. फडणवीस सरकारला 3 वर्ष पूर्ण होत असताना साडेसात हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून सध्या मतदारांच्या मनात नेमकं काय चालू आहे, हे समोर येणार आहे. दरम्यान मतदान शांततेत पार पडावं यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीसही सज्ज आहेत.
 
इथं होणार ग्रामपंचायतींसाठी मतदान? 
नाशिक – 170 , नांदेड – 171, परभणी – 126, जालना – 240, लातूर – 353, हिंगोली – 49,  अमरावती – 262,  अकोला – 272, वाशिम – 287,  बुलडाणा – 280, धुळे – 108, जळगाव – 138, नंदुरबार – 51, औरंगाबाद – 212, बीड – 703

Web Title: Polling for the Gram Panchayats today, for the first time in the 16 districts all over the state, the direct election for the post of Sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.