पनवेल, भिवंडी, मालेगावात २४ मे रोजी मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2017 06:09 AM2017-04-20T06:09:40+5:302017-04-20T06:09:40+5:30
पनवेल, भिवंडी-निजामपूर व मालेगाव महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २४ मे रोजी मतदान, तर २६ मे रोजी मतमोजणी होईल
मुंबई : पनवेल, भिवंडी-निजामपूर व मालेगाव महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २४ मे रोजी मतदान, तर २६ मे रोजी मतमोजणी होईल. त्यासाठी संबंधित महानगरपालिकांच्या क्षेत्रांत बुधवारपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी केली.
पनवेल महापालिकेची ही पहिलीच निवडणूक आहे. भिवंडी-निजामपूर पालिकेची मुदत १० जून, तर मालेगावची मुदत १४ जूनला संपत आहे.
तीन महापालिकांसाठी उद्या मतमोजणी
मुंबई : चंद्रपूर, परभणी व लातूर महापालिकेसाठी झालेल्या निवडणुकीत ऊन्हाच्या तडाख्यातही बुधवारी सायंकाळी साडेसहापर्यंत सरासरी ६२ टक्के मतदान झाले. शुक्रवारी तीन महापालिकांच्या निवडणुकीची मतमोजणी होईल. चंद्रपूरमध्ये ५८, परभणीत ६५ तर लातूरमध्ये सरासरी ६२ टक्के मतदान झाले. दुपारी ४ नंतर उकाडा थोडा कमी झाल्यानंतर, नागरिक घराबाहेर पडल्याने टक्केवारीत मुख्यत: वाढ झाली. काही मतदान केंद्रांवरील इव्हीएम मशिनमधील तांत्रिक बिघाड वगळता शांततेत मतदान पार पडले. विशेष म्हणजे, मागील वर्षीच्या तुलनेत मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली. प्रभाग क्रमांक २ मध्ये काँग्रेसच्या उमेदवारास मारहाण झाली. प्रभाग क्र. ३, ११ मध्येही हाणामारीची घटना घडली.