सांगली, जळगाव महापालिकांसाठी १ आॅगस्टला मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 02:57 AM2018-06-26T02:57:39+5:302018-06-26T02:57:42+5:30
सांगली-मिरज-कुपवाड व जळगाव महापालिकांच्या; तसेच वसई-विरार महापालिकेच्या एका रिक्तपदाच्या पोटनिवडणुकीसाठी १ आॅगस्ट रोजी मतदान होणार आहे
मुंबई : सांगली-मिरज-कुपवाड व जळगाव महापालिकांच्या; तसेच वसई-विरार महापालिकेच्या एका रिक्तपदाच्या पोटनिवडणुकीसाठी १ आॅगस्ट रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी ३ आॅगस्ट २०१८ रोजी असून त्यासाठी संबंधित क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी सोमवारी येथे केली.
सांगली महापालिकेची मुदत
१३ आॅगस्ट रोजी संपत असून
तेथे मतदारांची संख्या सुमारे ४
लाख २३ हजार ३६६ आहे. एकूण
२० प्रभागांतील ७८ जागांसाठी
मतदान होणार आहे. जळगाव महापालिकेची मुदत १९ सप्टेंबर
रोजी संपत असून तेथील मतदारांची संख्या सुमारे ३ लाख ६५ हजार
१५ आहे. एकूण १९ प्रभागातील
७५ जागांसाठी मतदान होणार
आहे, अशी माहिती त्यांनी
दिली.
तसेच वसई-विरार शहर महापालिकेतील प्रभाग क्र. ९७च्या रिक्त पदासाठीही १ आॅगस्ट रोजीच मतदान होणार आहे.