प्रदूषणमुक्त दिवाळीची विद्यार्थी घेणार शपथ! शिक्षण संचालकांचे पत्र; राज्यभरातील शाळांमध्ये उपक्रम घेण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 03:45 AM2017-10-10T03:45:25+5:302017-10-10T03:45:45+5:30
प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी यंदा शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक दिवाळीचे महत्त्व पटवून देण्यासाठी मंगळवारी सकाळी राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना
नितीन गव्हाळे
अकोला : प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी यंदा शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक दिवाळीचे महत्त्व पटवून देण्यासाठी मंगळवारी सकाळी राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना ‘प्रदूषणमुक्त दिवाळी’ची शपथ देण्यात येणार आहे.
आतषबाजीमुळे दिवाळीत मोठ्या प्रमाणात वायू आणि ध्वनी प्रदूषण होते. त्यामुळे फुप्फुसाचे, श्वसनाचे आजार होतात.
आतषबाजी टाळण्यासाठी मन परिवर्तन व्हावे, या उद्देशाने यंदा प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प
अभियान राबविण्याचा निर्णय पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी घेतला आहे. त्यानुसार शिक्षण विभागाला पत्र पाठवून विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळीची शपथ देण्याचे सूचित करण्यात आले आहे.
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालय स्तरावर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यातून परीक्षार्थी विद्यार्थ्यांना वगळण्यात आले आहे.
राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी एकाच वेळी आणि एकत्रितपणे शपथ घ्यावी, असे आदेशात म्हटले आहे. राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या आदेशानंतर प्राथमिकचे शिक्षण संचालक सुनील चौहान यांनी शिक्षणाधिकाºयांनासुद्धा पत्र पाठवून सर्व शाळांमध्ये प्रदूषणमुक्त दिवाळीचा संकल्प अभियान राबविण्याचे आदेश दिले आहेत.