डाळिंबाच्या बागेचे सरपण!

By admin | Published: May 8, 2016 02:23 AM2016-05-08T02:23:12+5:302016-05-08T02:23:12+5:30

सरणवाडीतील ८४ एकरावर फुलविलेली डाळिंबाची बाग पाण्याअभावी पूर्णपणे सुकली असून तिचा उपयोग आता केवळ सरपणासाठीच होण्याची स्थिती आहे.

Pomegranate garden firewood! | डाळिंबाच्या बागेचे सरपण!

डाळिंबाच्या बागेचे सरपण!

Next

- संदीप अंकलकोटे, चाकूर (लातूर)

सरणवाडीतील ८४ एकरावर फुलविलेली डाळिंबाची बाग पाण्याअभावी पूर्णपणे सुकली असून तिचा उपयोग आता केवळ सरपणासाठीच होण्याची स्थिती आहे.
चाकूर येथील उत्तमराव जाधव- पाटील यांनी सरणवाडीवरील डोंगराळ माळरानावर २०१०- ११ मध्ये ८४ एकरावर डाळिंबाची लागवड केली़ मोठ्या जिद्दीने आणि परिश्रमाने ही बाग फुलविली़ त्यासाठी त्यांनी एकरी ७० ते ७५ हजार रूपये खर्च केला. पहिल्या वर्षी त्यांना बागेतून १ कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले़ त्यामुळे त्यांनी आणखी ३० ते ३५ लाखांचा खर्च केला़ २०१३-१४ मध्ये डाळिंबाच्या बागेतून दीड कोटींचे उत्पन्न मिळाले़ दर्जा उत्कृष्ट असल्याने त्यांचे डाळिंब कोलकाता, बंगळुरू, नागपूर येथील बाजारपेठेत विक्रीसाठी जात असत.बागेसाठी त्यांनी १८ बोअरही घेतले. मात्र त्यातील केवळ ७ बोअरला पाणी लागले़ त्यातून त्यांनी बाग जपली होती. परंतु, यंदा सर्वच बोअरचे पाणी आटल्याने बाग सुकली. पाण्याअभावी झाडे वाळत असल्याने विकतचे पाणी आणून बाग जगविण्याचाही त्यांनी प्रयत्न केला, मात्र तो निष्फळ ठरला.

३६ मजूर : बागेची जोपासणा करण्यासाठी दरवर्षी ३६ मजूर ठेवले जात असत़ तसेच ३६ महिला रोजंदारीवर काम करीत़ बाग वाळल्याने जाधव यांनी केशर आंबा, चिकू, आवळा, पपई या फळबागांतील काम या मजुरांना उपलब्ध करून दिले आहे़

शासनाने फळबागेसाठी विमा संरक्षण दिले पाहिजे़ तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळाले पाहिजे.- उत्तमराव जाधव, शेतकरी

Web Title: Pomegranate garden firewood!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.